Monsoon Health Tips: पावसाळ्यात वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, या 3 फळांचे सेवन आहारात आवश्य करा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पावसाळ्याचा ऋतू आनंददायी असला तरी ओलसर वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो. या काळात योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.
जालना: पावसाळ्याचा ऋतू आनंददायी असला तरी ओलसर वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो. या काळात योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात खाण्यासाठी उपयुक्त फळांबाबत आहार सल्लागार अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि पचनास हलकी अशी फळे निवडावीत. पावसाळ्यात डाळिंब खाणे अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच, डाळिंब पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा पुरवते, असं अमृता कुलकर्णी सांगतात.
advertisement
सफरचंद हा आणखी एक उत्तम पर्याय आहे. सफरचंदामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवतात. पावसाळ्यात पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. सफरचंद सलाड किंवा स्मूदीच्या रूपातही खाता येईल. नाशपती हे फळ पावसाळ्यासाठी उत्तम आहे. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. तसेच, यातील फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते. नाशपती गोड आणि रसाळ असल्याने लहान मुलांनाही आवडते, असं अमृता कुलकर्णी सांगतात.
advertisement
जांभूळ हे पावसाळ्यातील स्थानिक फळ आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, सी असतात, जे त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत. जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. फळे स्वच्छ धुवून खावीत, कारण पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि किटाणूंचा धोका जास्त असतो. तसेच, स्थानिक आणि हंगामी फळांना प्राधान्य द्यावे. या फळांचा समावेश आहारात केल्यास पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहणे सोपे होईल, असंही अमृता कुलकर्णी यांनी सांगितले.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 12, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Health Tips: पावसाळ्यात वाढेल रोगप्रतिकारक शक्ती, या 3 फळांचे सेवन आहारात आवश्य करा, Video