कुकरमध्ये शिजवलेलं जेवण खाल्लं आणि थेट हॉस्पिटलमध्ये, मुंबईत 50 वर्षीय व्यक्तीसोबत काय घडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबईतील एका 50 वर्षीय व्यक्तीला याचा अनुभव प्रत्यक्षात आला. या व्यक्तीला अचानक स्मरणशक्ती कमी होणे, सतत थकवा जाणवणे आणि पायामध्ये वेदना असा त्रास सुरू झाला.
मुंबई : बहुतांश घरांमध्ये प्रेशर कुकर हा स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग झालेला आहे. सकाळच्या घाईगडबडीत वेळ वाचवण्यासाठी, गॅसची बचत करण्यासाठी आणि लवकर जेवण तयार होण्यासाठी बहुतांश लोक प्रेशर कुकरचा वापर करतात. भात, डाळ, सूप, खिचडी अशा अनेक प्रकारच्या पदार्थांसाठी प्रेशर कुकर अत्यंत उपयुक्त मानला जातो. मात्र, याच कुकरचा वापर जर जुना किंवा चुकीचा असेल, तर तो तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
मुंबईतील एका 50 वर्षीय व्यक्तीला याचा अनुभव प्रत्यक्षात आला. या व्यक्तीला अचानक स्मरणशक्ती कमी होणे, सतत थकवा जाणवणे आणि पायामध्ये वेदना असा त्रास सुरू झाला. सुरुवातीला डॉक्टरांनाही नेमकी कारण लक्षात आलं नाही, पण शेवटी 'हेवी मेटल स्क्रीनिंग' टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या शरीरात लीड (शिसं) या धातूचे प्रमाण खूप जास्त आहे. जवळपास 22 मायक्रोग्रॅम प्रति डेसिलीटर.
advertisement
इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. विशाल गाबले यांच्या म्हणण्यानुसार, हे लक्षण 'क्रॉनिक लीड पॉइझनिंग' म्हणजेच दीर्घकालीन शिसं विषबाधेची स्पष्ट लक्षणं आहेत. त्यांनी याचे मूळ कारण शोधले असता लक्षात आलं की या व्यक्तीच्या घरात वापरला जाणारा जुना अॅल्युमिनियमचा प्रेशर कुकरच या विषबाधेचं मुख्य कारण ठरला होता.
ते स्पष्ट करतात की, जुने किंवा खराब झालेले अॅल्युमिनियम कुकर जेव्हा आमटी, सांबर, रस्सा यांसारख्या आम्लयुक्त (acidic) पदार्थांसोबत वापरले जातात, तेव्हा त्या कुकरमधून लीड आणि अॅल्युमिनियमचे कण अन्नात मिसळतात आणि अशा प्रकारे ते शरीरात जातात. हे कण शरीरात हळूहळू जमा होऊन अनेक गंभीर समस्यांना निमंत्रण देतात.
advertisement
डॉ. गाबले यांनी संबंधित रुग्णावर किलेशन थेरपी केली. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत विशेष औषधांच्या साहाय्याने शरीरातून लीडसारखी धातू मूत्राच्या माध्यमातून बाहेर टाकली जाते. यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली.
लीड विषबाधा ही लक्षणं सुरुवातीला ओळखणे कठीण असते. थकवा, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमजोर होणे, वर्तनातील बदल, पचनातील समस्या, यौन इच्छा कमी होणे, अगदी काही प्रकरणांमध्ये बांझपणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जुने कुकर वापरत असाल, तर काळजी घ्या. शक्य असल्यास स्टीलसारख्या सुरक्षित पर्यायांचा विचार करा आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी अशा धोक्यांपासून सतर्क राहा.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कुकरमध्ये शिजवलेलं जेवण खाल्लं आणि थेट हॉस्पिटलमध्ये, मुंबईत 50 वर्षीय व्यक्तीसोबत काय घडलं?