बेली फॅट हायलाईट करणारी कुर्ती नको! ए-लाईन की स्ट्रेट कट?  जाणून घ्या कोणती कुर्ती तुमच्यासाठी बेस्ट...

Last Updated:

कुर्ती (Kurti) हा भारतीय महिलांच्या वॉर्डरोबमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या वापरासाठी असो, ऑफिस किंवा कॉलेजसाठी, कुर्ती नेहमीच परफेक्ट असते. मात्र...

Kurti
Kurti
कुर्ती (Kurti) हा भारतीय महिलांच्या वॉर्डरोबमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या वापरासाठी असो, ऑफिस किंवा कॉलेजसाठी, कुर्ती नेहमीच परफेक्ट असते. मात्र, जर तुमचे वजन थोडे जास्त असेल, विशेषतः पोटावरची चरबी (Belly Fat) जास्त असेल, तर अनेकदा चुकीच्या कुर्त्यामुळे ही चरबी अधिक हायलाइट होते. चुकीचा कुर्ता निवडल्याने किंवा स्टाईलिंगमध्ये चूक झाल्यास तुमचा संपूर्ण लुक बिघडू शकतो. याचा अर्थ तुम्ही कुर्ती घालणे थांबवावे असा नाही.
इमेज कोच साक्षी यांनी अशाच काही स्टाईलिंगच्या चुकांबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्या महिलांचे पोट थोडे बाहेर (Protruding Tummy) आलेले असल्यास त्यांनी टाळल्या पाहिजेत.
बेली फॅट जास्त असल्यास 'या' ४ चुका टाळा
१. शरीराला चिकटून राहणारे कुर्ते टाळा: जर तुमचा बांधा कर्वी (Curvy) असेल, तर शरीराला अगदी चिकटून (Clingy) राहणारे आणि खास करून पोटाच्या भागावर खूप घट्ट (Too Tight) बसणारे कुर्ते घालणे टाळा. अशा कपड्यांमुळे पोटाची चरबी अधिक स्पष्टपणे दिसते आणि ती अधिक हायलाइट होते.
advertisement
२. पोटाच्या भागावर जास्त डिझाईन नको: फॅशन तज्ज्ञांच्या मते, तुम्ही पोटाच्या भागावर जास्त डिटेलिंग (Too Much Detailing) असलेले कुर्ते घालू नका. तसेच, ॲक्सेसरीज म्हणून पोटावर बेल्ट्स वापरणे देखील टाळा. कारण यामुळे लोकांचे लक्ष थेट तुमच्या बेली फॅटवर जाते.
३. शॉर्ट कुर्त्यासोबत कॉन्ट्रास्ट बॉटम नको: तुम्ही जर शॉर्ट कुर्ती (Short Kurti) घालत असाल, तर तिच्यासोबत कॉन्ट्रास्ट (Contrasting) रंगाचे बॉटम घालणे टाळा. या दोन वेगवेगळ्या रंगांमुळे पोटाचा भाग आणखी मोठा दिसतो आणि लक्ष वेधून घेतो.
advertisement
  • उत्तम पर्याय: बॉटम (Salwar, Pajama, Jeans) कुर्त्याच्या समान रंगाचा (Same Color) किंवा अगदी समान प्रिंट-पॅटर्नचा निवडल्यास तुमचा लुक अधिक संतुलित आणि लांब (Taller) दिसेल.
४. मिड-लेन्थ लेअरिंग टाळा: तज्ज्ञ सांगतात की, कुर्त्यासोबत मिड-लेन्थ (Mid-Length) लेअरिंग टाळले पाहिजे. म्हणजेच, जे जाकीट किंवा श्रग तुमच्या कंबरेच्या खाली संपते, ते घालू नका. असे कपडे किंवा जॅकेट पोटाचे फॅट जास्त हायलाइट करतात.
advertisement
  • उत्तम पर्याय: त्याऐवजी तुम्ही लाँग लेन्थ जॅकेट किंवा श्रग घालू शकता. यामुळे तुमची उंची अधिक वाटेल आणि पोटाचे फॅट लपण्यास मदत होईल.

तुमच्यासाठी सर्वोत्तम कुर्ता कोणता?

तुमचे पोट थोडे बाहेर आलेले असल्यास, तुम्ही नेहमी अशा कुर्त्यांची निवड करावी, ज्याचे फॅब्रिक फ्लोई (Flowy) आणि गुळगुळीत (Smooth) असेल. यामुळे तुम्हाला त्यात आरामदायक वाटेल आणि तुमच्या बॉडी शेपला एक नैसर्गिकरित्या संतुलित लुक मिळेल.
advertisement
  • तज्ज्ञांच्या मते, तुमच्यासाठी 'ए-लाईन कुर्ता' (A-Line Kurta) आणि 'स्ट्रेट कट कुर्ता' (Straight Cut Kurta) हे सर्वोत्तम ठरतील!
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बेली फॅट हायलाईट करणारी कुर्ती नको! ए-लाईन की स्ट्रेट कट?  जाणून घ्या कोणती कुर्ती तुमच्यासाठी बेस्ट...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement