High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरावर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच सावधान व्हा!
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण अनहेल्दी लाइफस्टाइल हे आहे. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागले की शरीरावर त्याची लक्षण दिसू लागतात, तेव्हा ही लक्षण समजून वेळीच सावधान झाल्यास पुढील धोका कमी होतो.
कोलेस्ट्रॉलचे चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकार असतात. शरीरात निरोगी पेशी तयार करण्यासाठी रक्तात चांगले कोलेस्टेरॉल असणे आवश्यक असते. परंतु जेव्हा खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL चे प्रमाण वाढते तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण अनहेल्दी लाइफस्टाइल हे आहे. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागले की शरीरावर त्याची लक्षण दिसू लागतात, तेव्हा ही लक्षण समजून वेळीच सावधान झाल्यास पुढील धोका कमी होतो.
हाय ब्लडप्रेशर : शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा थेट संबंध उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरशी असतो. रक्तात चरबी जितकी वाढते तितका रक्तदाब वाढतो. कारण जेव्हा कोलेस्टेरॉलमुळे रक्तपुरवठ्यात अडथळे येतात तेव्हा हृदयाला रक्त पंप करण्यासाठी धमन्यांना अधिक मेहनत करावी लागते.
Saving Electricity : घरामध्ये करा हे 5 छोटे छोटे बदल; वीज बिल होईल अर्धे आणि संभाव्य दुर्घटनाही टळेल
advertisement
पाय सुन्न पडणे : पाय सुन्न होणे हे देखील शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. याचा अर्थ रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे पाय दुखणे, सुन्न होणे, मुंग्या येणे इत्यादी लक्षण जाणवतात.
नखांचा रंग बदलणे : जेव्हा शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो. बोटांना योग्य रक्तपुरवठा न झाल्यामुळे नखांचा रंग हलका गुलाबी ते पिवळा होऊ लागतो. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपचार घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2023 2:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरावर दिसतात 'ही' लक्षण, वेळीच सावधान व्हा!