Fridge Life Span : एक फ्रिज किती वर्षांपर्यंत वापरला पाहिजे? या गाईडलाईन्स फॉलो करा, नाहीतर घरात होऊ शकतो धमाका
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
‘फ्रीज लाइफ स्पॅन’ म्हणजे काय आणि फ्रीज खरेदी केल्यानंतर तुम्ही किती वर्षांसाठी तो वापरू शकता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रेफ्रिजरेटरचं वय क्वालिटी, ब्रँड आणि मेंटेनेंस यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
घरातील काही आवश्यक वस्तूंपैकी फ्रीजही एक आहे. पाणी थंड करण्यासाठी, भाजीपाला साठवणे असो वा दूध व कोल्डड्रिंक चांगलं राहावं यासाठी फ्रीजचा वापर होतो. ही एक इलेक्ट्रिक वस्तू असल्याने ती कायम चांगलीच राहील असं नाही. बरेच लोक एक फ्रीज 15 ते 20 वर्षे वापरतात. काहींना तर फ्रीजचंही वय असते हे माहीतच नसते. जास्त जुना फ्रीज फ्रीज जास्त काळ वापरल्याने त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते.
तुमचा फ्रीज किती काळ टिकतो
सामान्यतः एक फ्रीज 10 ते 15 वर्षे टिकू शकतो, पण सेफ्टी पाहता तो 10 ते 12 वर्षांनी बदलला पाहिजे. जर तुमचा फ्रीज 10 वर्षांपेक्षा जुना असेल, तर तो वापरताना काळजी घ्या. कारण त्याचे कॉम्प्रेसर आणि इतर इलेक्ट्रिकल भाग खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. याशिवाय क्वालिटी खूप महत्त्वाची आहे, ब्रँडेड कंपन्यांचे रेफ्रिजरेटर लोकल ब्रँडपेक्षा जास्त काळ टिकतात. तसेच फ्रीजची योग्य देखभाल करणं देखील महत्त्वाचं असतं. फ्रीजचं नियमित सर्व्हिसिंग करा आणि फ्रीज डिफ्रॉस्ट करत राहाल, मग तुमचा फ्रीज दीर्घकाळ टिकेल.
advertisement
फ्रीज जुने झाल्यावर देतात हे संकेत
विजेचा वापर: नवीन टेक्नॉलॉजी असलेल्या फ्रीजच्या तुलनेत 15 किंवा 20 वर्षे जुने फ्रीज जास्त वीज वापरू लागतात.
थंडावा: जर फ्रीजमध्ये काही भाग चांगले काम करत असतील पण काही भाग व्यवस्थित थंड होत नसतील आणि तुमचा फ्रीज 15 किंवा 20 वर्षांपेक्षा जुना असेल तर याचा अर्थ फ्रीज बदलण्याची वेळ आली आहे.
advertisement
फ्रीजचा कॉम्प्रेसर आणि गॅस लीकेज यांसारख्या गोष्टी वारंवार होत असतील, तर अशावेळी नवीन फ्रीज घेण्यापेक्षा दुरुस्तीचा खर्च जास्त असू शकतो. वर नमूद केलेल्यापैकी कोणतेही संकेत दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा जुना फ्रीज बदलण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही नवीन फ्रीज घेण्याचा विचार केला पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवून तुमचं घर सुरक्षित ठेवू शकता आणि संभाव्य दुर्घटनापासून बचाव करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2024 10:07 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fridge Life Span : एक फ्रिज किती वर्षांपर्यंत वापरला पाहिजे? या गाईडलाईन्स फॉलो करा, नाहीतर घरात होऊ शकतो धमाका