Car Cleaning Tips : पावसाळ्यात कारच्या केबिनमधून येते दुर्गंधी? 5 सोप्या टिप्स वापरा, कारमध्ये दरवळेल सुगंध
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
तुम्हालाही कार केबिनमध्ये पावसाळ्यात येणारा दुर्गंध टाळायची असेल तर काही उपाय सांगणार आहोत.
पाऊस सुरु झाला की उन्हाच्या झळांपासून सुटका होते हे खरं, पण गाडी चालवणाऱ्यांच्या डोकेदुखीत मात्र पावसाळ्यात वाढ होते. त्यापैकी प्रमुख डोकेदुखी म्हणजे कार केबिनमधून येणारी दुर्गंधी. तुम्हालाही कार केबिनमध्ये पावसाळ्यात येणारा दुर्गंध टाळायची असेल तर काही उपाय सांगणार आहोत.
पावसाळ्यात पार्किंगमधील कार उघडून आतमध्ये बसताच एक नकोसा वास नाकात शिरला तर सगळा प्रवास त्रासदायक होतो. पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे अनेकांच्या कारमध्ये असा वास येतो. तो घालवायचा असेल तर काही उपाय करणं आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा कारची व्हॅक्युम क्लिनरने स्वच्छता करा. त्यामुळे सीट्स आणि इतर भागातील धूळ, घाण कमी होईल. व्हॅक्युम क्लिनरमुळे आर्द्रता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपोआपच घाण वासही कमी होतो. हल्ली बाजारात अनेक प्रकारचे कार एअर फ्रेशनर्स आणि स्प्रे मिळतात. तुमच्या आवडीच्या वासाचे फ्रेशनर कारमध्ये ठेवून तुम्ही घाण वास कमी करु शकता. हे फ्रेशनर्स स्प्रे किंवा इतर स्वरुपात मिळतात.
advertisement
कार शोरुम्समध्ये किंवा ऑनलाईन कार ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला ते मिळू शकतात. कारमधील घाण वासाचं मुख्य कारण फ्लोअर मॅट्सवर पडणारा कचरा हे असतं. त्यामुळे तो नियमित स्वच्छ करणं आवश्यक आहे. फ्लोर मॅट्स नियमितपणे धुवून वाळवणं हे कारमधील वास टाळण्यासाठी आवश्यक आहे. कारमध्ये जास्त कचरा पडू नये यासाठी एक छोटं डस्टबिन ठेवा. कार डस्टबिन ऑनलाईन सहज मिळतात. या डस्टबिनमध्ये कचरा टाका आणि तो कुजल्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीपासून स्वतःची सुटका करुन घ्या. जमेल तेव्हा कारच्या खिडक्या उघड्या ठेवा. हवा खेळती राहिल्यामुळे घाण वास आपोआप कमी होईल. कारमधील आर्द्रताही त्यामुळे कमी होईल.
advertisement
कारमध्ये खाण्याचे पदार्थ सांडत असतील तर त्यामुळे असा वास येतो. तो वास घालवण्यासाठी तुम्ही कार परफ्युमचा वापर करु शकता. कारमध्ये तुम्ही काही खात असाल तर खाऊन होताच आधी कारची स्वच्छता करा. खाद्यपदार्थ सडण्यापूर्वीच स्वच्छता केली तर घाण वास टाळण्यास मदत होईल. कारचे आतील पृष्ठभाग पाणी आणि व्हिनेगरच्या मिश्रणाने पुसा. त्यामुळे दुर्गंध कमी होईल. एका पुरचुंडीत बेकिंग सोडा बांधून कारमध्ये ठेवला तरी घाण वास कमी होईल. एसीचे फिल्टर नियमित स्वच्छ करा आणि खराब झाले की बदला. त्यामुळेही कारच्या आतील नकोसा वास कमी होईल. कार परफ्युम्स वापरल्यास कारमध्ये नेहमी हलका आणि छान सुगंध राहील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2024 8:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Car Cleaning Tips : पावसाळ्यात कारच्या केबिनमधून येते दुर्गंधी? 5 सोप्या टिप्स वापरा, कारमध्ये दरवळेल सुगंध