पावसाळ्यात ओलावा आणि कीडपासून करा रोपांचं संरक्षण, फक्त 10 रुपयांची पावडर ठरेल उपयोगी
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
पावसाळ्यात रोपांना कीड लागण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत घराच्या बागेत किंवा घराच्या अंगणात, बाल्कनीत लावण्यात आलेल्या कुंडीतल्या रोपांची काळजी कशी घ्यावी, असा प्रश्न अनेकांसमोर असतो.
बदलत्या काळात बागकामाकडे अनेकांचा कल वाढतोय. अंगणात, बाल्कनीत आणि टेरेसवर विविध प्रकारची रोपं लावली जातात. परंतु बदलत्या हवामानामुळे रोपांच्या संगोपनात अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. रोपांची वाढ थांबते. पावसाळ्यातही रोपांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना पोषण देण्याबरोबरच कीटकांपासूनही त्यांचं संरक्षण करावं लागतं. यासाठी तुरटी खूपच उपयुक्त ठरू शकते.
असं तयार करा तुरटीचं खत
पावसाळ्यात तुरटीचा खत म्हणून वापर करता येतो. यासाठी सुमारे 20 ग्रॅम तुरटीचा छोटा तुकडा घ्या आणि एका ग्लास पाण्यात घाला. जेव्हा ऊन पडेल, तेव्हा रोपाच्या बाजूची माती थोडी उकरून एक दिवस तशीच ठेवा. जेणेकरून रोपाला थोडी हवाही मिळेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुरटीचं पाणी रोपाला घाला. महिन्यातून किंवा दीड महिन्यातून एकदा ही पद्धत तुम्ही वापरू शकता.
advertisement
या वनस्पतींसाठी वापरू शकता तुरटी
तुरटी खूप आंबट असते. म्हणून ज्या रोपांना सायट्रिक अॅसिडची गरज असते, त्या रोपांना तुरटीचं खत घालावं. याशिवाय फुलांच्या रोपांना तुरटी घातल्यानं ती निरोगी राहतात. तसंच फुलेही अधिक बहरतात. परंतु तुरटीच्या जास्त वापरामुळे पानं जळू शकतात.
advertisement
मुंग्या आणि कीटकांपासून झाडांचं होतं संरक्षण
वनस्पतींवर मुंग्या किंवा किडे असल्यास तुम्ही तुरटी खताचा वापर करू शकता. यासाठी कुंडीखाली तुरटी ठेवा किंवा कुंडीच्या मातीत मिसळा. ती कीटकनाशक म्हणून काम करील व झाडं वाढण्यास मदत होईल.
कीटकनाशक म्हणून उपयुक्त
तुरटीचा वापर कीटकनाशक म्हणून होतो. झाडावर किड्यांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तुरटी पाण्यात मिसळून ते पाणी झाडांवर घाला. त्यामुळे वाळवीसारखे काही प्रकारचे किडे मरू शकतात. कुंडीत तुरटी घालूनही झाडांना कीटकापासून वाचवता येतं.
advertisement
मातीची प्रत वाढते
तुम्ही झाड लावण्यासाठी जी माती वापरली आहे, तिची प्रत तुरटीच्या साह्याने वाढते. यामुळे झाडाची वाढ सुधारेल. तुम्ही तुरटीचं पाणी झाडांना पाणी देण्यासाठी किंवा खत म्हणूनही वापरू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2024 10:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
पावसाळ्यात ओलावा आणि कीडपासून करा रोपांचं संरक्षण, फक्त 10 रुपयांची पावडर ठरेल उपयोगी