Jugaad Video :गावी जाताय, सोन्याचे दागिने टॉयलेटमध्ये ठेवा; परतताच दिसेल 'चमत्कार'

Last Updated:

अनेक गृहिणी काही ना काही घरगुती जुगाड करत असतात. दागिन्यांचा हा जुगाडही अशाच जुगाडांपैकी एक आहे. अशा जुगाडाचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

किचन जुगाड/फोटो : युट्युब व्हिडीओ ग्रॅब
किचन जुगाड/फोटो : युट्युब व्हिडीओ ग्रॅब
मुंबई : गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेकांना गणपतीसाठी गावी जाण्याचे वेध लागले आहेत. काहींनी तर गणपतीसाठी गावी जाण्याची तयारीही सुरू केली आहे. तुम्हीही गणपतीला गावी जाण्याच्या तयारीत असाल तर गावी जाण्याआधी एक काम जरूर करा. तुमचे सोन्याचे दागिने असतील तर ते टॉयलेटमध्ये ठेवा. या जबरदस्त जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दागिने म्हटलं की ते आपण सामान्यपणे लॉकरमध्ये ठेवतो. मग ते सोन्याचे असो, चांदीचे असो वा हिऱ्याचे. महाग असल्याने आणि चोरीला जाण्याची भीती असल्याने ते आपण कपाटातील किंवा बँकेतील लॉकरमध्ये ठेवतो. पण टॉयलेटमध्ये दागिने हे वाचूनच आश्चर्य वाटेल. पण याचा मोठा फायदा आहे. तो काय हे एका गृहिणीने एका व्हिडीओतून सांगितलं आहे.
advertisement
नेमकं करायचं काय?
गृहिणीने व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तिने वेगवेगळे ज्वेलरी बॉक्स घेतले आहेत. त्यात वेगवेगळे दागिने आहेत. ते सर्व दागिने तिने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये केले आहेत. अशाच पद्धतीने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये सर्व दागिने ठेवण्याचा सल्ला तिने दिला आहे. त्यानंतर हा बॉक्स एका कापडात गुंडाळा, असं तिनं सांगितलं आहे.
advertisement
नंतर ही गृहिणी हा कापडात गुंडाळलेला ज्वेलरी बॉक्स टॉयलेटमध्ये घेऊन जाते. तिथं एक डस्टबिन आहे. जो स्वच्छ आणि पूर्ण रिकामा आहे. म्हणजे याआधी कचऱ्यासाठी हा डस्टबिन वापरलेला नाही. या डस्टबिनमध्ये ती हा बॉक्स ठेवते. त्यानंतर ती त्यावर साबणाचे रिकामे बॉक्स आणि रिकाम्या बाटल्या टाकते. जेणेकरून दागिन्यांचा बॉक्स पूर्णपणे झाकला जाईल.
advertisement
याचा फायदा काय?
गृहिणीने सांगितल्यानुसार जेव्हा तुम्ही कधी घराबाहेर जाणार असाल आणि घरात महागडे दागिने असतील जे चोरीला जाण्याची भीती वगैरे असेल तेव्हा तुम्ही हा जुगाड करू शकता. चोर टॉयलेटमध्ये जाऊन डस्टबिन उघडून तर बिलकुल पाहणार नाहीत. डस्टबिनमध्ये असं काही असेल याचा कुणी विचारही करणार नाही. जरी काही टाकण्यासाठी डस्टबिन उघडलं तरी त्यात वर टाकलेला कचराच दिसेल. ज्यात कुणी हात टाकणार नाही.
advertisement
इथं पाहा व्हिडीओ
इंडियन व्लॉगर पिंकी युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Jugaad Video :गावी जाताय, सोन्याचे दागिने टॉयलेटमध्ये ठेवा; परतताच दिसेल 'चमत्कार'
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement