Fact Check : बाजारात आली कॅप्सूल Maggi ? फक्त एक गोळी उकळत्या पाण्यात टाका आणि पोटभर खा नूडल्स, Viral Video ची सर्वत्र चर्चा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
capsule maggi : या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उकळत्या पाण्यात मॅगीची एक कॅप्सूल टाकतो आणि काही सेकंदांतच त्या कॅप्सूलमधून पूर्ण तयार मॅगी बाहेर येते.
मुंबई : सोशल मीडिया हे असं जग आहे जिथे आपल्याला सगळ्या गोष्टी माहित पडतात किंवा ट्रेंड समजतात. रिल्स, पोस्ट किंवा मिम्सच्या माध्यमातून आपल्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्यामुळे जगात काय सुरु आहे हे आपल्याला लगेच कळतं. त्यामुळे लोक इथे नेहमीच सक्रिय असतात. पण हे देखील विसरायला नको की हे जग असं जग आहे, जिथे कधीकधी काय खरं आणि काय खोटं हे कळत नाही आणि लोक चुकीच्या गोष्टींना भुलतात.
सध्या सोशल मीडियावर एक विचित्र आणि तितकाच धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उकळत्या पाण्यात मॅगीची एक कॅप्सूल टाकतो आणि काही सेकंदांतच त्या कॅप्सूलमधून पूर्ण तयार मॅगी बाहेर येते, असा दावा केला जातो. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून “आता मॅगी कॅप्सूलमध्ये येऊ लागली का?” मग तर कामट सोपं झालं असं वाटू लागतं. आता जर मॅगी अशी येऊ लागली आहे. तर प्रवासात वैगरे कुठेही आपण त्याला घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे खाण्याचा प्रॉब्लम सुटला.
advertisement
अनेकांनी याला खरं मानलं आहे आणि त्याला बाजारात शोधू लागले आहेत. पण हा दावा खरा आहे का? याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय दाखवलंय?
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, औषधाच्या कॅप्सूलसारखी दिसणारी एक गोळी उकळत्या पाण्यात टाकली जाते. काही क्षणांतच ती कॅप्सूल फुटते आणि त्यातून मॅगीच्या नूडल्स बाहेर येतात. वरून मसाला, भाज्या घालून लगेच मॅगी तयार होते, असा सीन दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तो खरा मानून शेअरही केला.
advertisement
पण हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आणि AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून तयार केलेला आहे.
सध्या मॅगी किंवा कोणत्याही इन्स्टंट नूडल्स कंपनीने “कॅप्सूल मॅगी” असा कोणताही अधिकृत प्रॉडक्ट लॉन्च केलेला नाही. मॅगी नूडल्सचे उत्पादन, पॅकेजिंग आणि शिजवण्याची प्रक्रिया पाहता, इतक्या लहान कॅप्सूलमध्ये संपूर्ण नूडल्स साठवणे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे. व्हिडीओमधील हालचाली, कॅप्सूल फुटण्याचा सीन आणि नूडल्स बाहेर येण्याची पद्धत बारकाईने पाहिली असता, ती AI जनरेटेड किंवा एडिटेड असल्याचे स्पष्ट होते. कारण लॉजिकली एवढ्या लहान कॅप्सूलमधून एवढी सगळी मॅगी किंवा नुडल्स बाहेर येणं शक्यच नाही.
advertisement
advertisement
असे फेक व्हिडीओ का व्हायरल होतात?
आजकाल AI तंत्रज्ञानामुळे वास्तवासारखे दिसणारे व्हिडीओ तयार करणे खूप सोपे झाले आहे. “नवं काहीतरी”, “अविश्वसनीय प्रयोग” किंवा “फूड हॅक्स” अशा विषयांवरचे व्हिडीओ लोक पटकन शेअर करतात. याच मानसिकतेचा गैरफायदा घेत असे खोटे व्हिडीओ पसरवले जातात.
काय काळजी घ्यावी?
कोणताही व्हायरल व्हिडीओ लगेच खरा मानू नका. अधिकृत कंपनी किंवा विश्वासार्ह न्यूज स्रोताकडून माहिती तपासा, संशयास्पद व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी विचार करा. AI जनरेटेड कंटेंट ओळखण्याची सवय लावा
advertisement
उकळत्या पाण्यात टाकताच तयार होणारी “मॅगी कॅप्सूल” ही कल्पना आकर्षक वाटत असली, तरी ती पूर्णपणे खोटी आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ वास्तव नाही, तर AI तंत्रज्ञानाने तयार केलेला फसवा कंटेंट आहे. त्यामुळे अशा व्हिडीओंवर विश्वास न ठेवता, सतर्क राहणेच योग्य.
असाच कॅप्सूलपासून डाळभात तयार होणारा ही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो देखील खोटा आहे. तो AI जनरेटेड आहे. त्यामुळे त्यावर भरोसा करु नका.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 3:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fact Check : बाजारात आली कॅप्सूल Maggi ? फक्त एक गोळी उकळत्या पाण्यात टाका आणि पोटभर खा नूडल्स, Viral Video ची सर्वत्र चर्चा










