Merry Christmas 2024: नाताळला द्या हटके गिफ्ट, नाशिकमध्ये फक्त 30 रुपयांपासून करा खरेदी
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Merry Christmas 2024: ख्रिश्चन बांधवांचा नाताळ हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यासाठी नाशिकमध्ये फक्त 30 रुपयांपासून खास वस्तू मिळत आहेत.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी, नाशिक: ख्रिश्चन बांधवांचा सण म्हणजेच 'नाताळ' अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ख्रिश्चन बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. या निमित्ताने घराला रंगरंगोटी करणे, आकर्षक सजावट करणे, यासाठी धावपळ सुरू असून सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नाशिक बाजारपेठेत आतापासूनच गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही विविध आकर्षक भेटवस्तू आणि खेळण्यांनी मार्केट सजलं आहे. नाशिकमधील दुकानात फक्त 30 रुपयांपासून अनेक वस्तू मिळतात. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवासाठी नाशिककर सज्ज झाले असून 25 डिसेंबर नाताळानिमित्त नाशिकमधील विविध चर्चमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. नाताळनिमित्त आपल्या मुलांना, मित्रांना आकर्षक गिफ्टदेखील देण्यात येते. हा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने बाजारपेठ अनेक आकर्षक वस्तूंनी भरली आहे. लहानमुलांसाठी सांताक्लॉजची आकर्षक खेळणी, घरामध्ये किंवा अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विविध रंगी शोभेच्या वस्तू, स्टार, विद्युत माळा, मेरी ख्रिसमसची स्टीकर, विविध आकारांतील घंटा, बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
30 रुपयांपासून वस्तू
यंदा लहानमुलांसाठी खास ख्रिसमस स्पेशल गिफ्टसुद्धा विक्रीसाठी आली आहेत. त्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. नाताळसाठी सर्व गोष्टी एकाच छताखाली आणि योग्य दरात नाशिकमधील शिरुडे गिफ्ट शॉप येथे मिळतात. कॉलेज रोड परिसरातील या दुकानाला मोठी गर्दी होतेय. अगदी 30 रुपयापासून ते 20 हजाराचे आकर्षक वस्तू आणि ख्रिसमस ट्री इथं उपलब्ध आहेत. तसेच सांताचे आकर्षक बाहुले देखील इथं मिळतात. त्यामुळे तुम्हीही नाताळची खरेदी करणार असाल तर हा एक उत्तम पर्याय असणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
December 12, 2024 2:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Merry Christmas 2024: नाताळला द्या हटके गिफ्ट, नाशिकमध्ये फक्त 30 रुपयांपासून करा खरेदी