Old Pickle : जेवणासोबत जुन लोणचं खाताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, डॉक्टरांनी समोर आणलं सत्य

Last Updated:

काही लोकांचं जेवण तर लोणच्या शिवाय पूर्ण होतच नाही. मात्र आता लोणचं प्रेमींसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

जेवणासोबत जुन लोणचं खाताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, डॉक्टरांनी समोर आणलं सत्य
जेवणासोबत जुन लोणचं खाताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, डॉक्टरांनी समोर आणलं सत्य
अनेकजणांना जेवताना चवीसाठी लोणचं खायला आवडतं. काही लोकांचं जेवण तर लोणच्या शिवाय पूर्ण होतच नाही. मात्र आता लोणचं प्रेमींसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कँसर इम्‍यूनोथेरेप‍िस्‍ट आणि द डेनवॅक्‍सचे फाउंडरडायरेक्टर डॉ जमाल ए. खान यांच्या म्हणण्यानुसार जुन लोणचं खाल्ल्याने कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. ज्या कुटुंबांमध्ये लोणच्याचे सेवन जास्त केले जाते अशा कुटुंबातून कॅन्सरच्या जास्त घटना समोर येतात.
जुन लोणचं फ्री रॅडिकल्स प्रोड्युसर करत :
डॉ. जमाल ए. खानचे म्हणणं आहे की, खूप जुन लोणच्याचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याचा धोका असतो. खूप जुन लोणचं असेल तर त्यात फ्री रेडिकल्स निर्माण होतात. डॉ. जमाल ए. खानने सांगितले की, 'आपल्याकडे अशी म्हण असते की लोणचं जितकं जुनं तितकं ते चवीला जास्त छान लागतं. मात्र सत्य काही वेगळंच असून लोणचं जितकं जुन असेल त्यात तितके फ्री रॅडिकल्स जास्त तयार होतात.कोणतेही अन्न जे दीर्घकाळ साठवले जाते त्यात भरपूर फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे जे एक ऑक्सिजन काढून टाकतात. पण हा ऑक्सिजन O2 नसून फक्त O आहे. हे आपल्या शरीरात तयार झालेल्या पेशींच्या भिंतींना नुकसान पोहोचवते.
advertisement
डॉ जमाल ए. खान सांगतात, 'ज्या कुटुंबात लोणच्याचे सेवन जास्त केले जाते अशा कुटुंबांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक असते. तेव्हा दररोज लोणचं खाण टाळावं. काल परवा बनवलेली लोणची ही ताजी आणि चांगली असतात, मात्र एक वर्ष किंवा दोन वर्ष जुनं लोणचं खाणं शक्यतो टाळावं. तुम्ही या ऋतूत लोणचे बनवा आणि याच ऋतूत सेवन करा. कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी तुम्ही जेवणात नेमकं काय खाता हे जास्त महत्वाचं ठरतं. तेव्हा जुन्या लोणच्यापासून अंतर ठेवून तुम्ही या आजारापासून स्वतःला वाचवू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Old Pickle : जेवणासोबत जुन लोणचं खाताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, डॉक्टरांनी समोर आणलं सत्य
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement