तुमच्या रोजच्या सवयींमुळे वॉशिंग मशीन होते खराब, करु नका या चुका!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
वॉशिंग मशीन आजकाल अनेक घरांमध्ये असतं. शहरी भागात तर सर्रास प्रत्येक घरात वॉशिंग मशीन असतं. त्यामुळे कपडे धुण्याचं काम अगदी सोपं होऊन जातं. कष्ट आणि वेळ वाचतो.
नवी दिल्ली : वॉशिंग मशीन आजकाल अनेक घरांमध्ये असतं. शहरी भागात तर सर्रास प्रत्येक घरात वॉशिंग मशीन असतं. त्यामुळे कपडे धुण्याचं काम अगदी सोपं होऊन जातं. कष्ट आणि वेळ वाचतो. तेवढ्या वेळात दुसरी कामं होतात. मात्र, वॉशिंग मशीन वापरताना या छोट्या-छोट्या चुका होत असतील तर त्यामुळे ते सतत बंद पडून तुमची गैरसोय करु शकतं किंवा कायमचं निकामी होऊ शकतं. वर्षानुवर्षे वॉशिंग मशीन वापरणारेही या चुका करतात. आज अशाच काही चुकांबद्दल माहिती देणार आहोत. या चुका टाळल्या तर तुमचं वॉशिंग मशीन वर्षानुवर्ष छान चालेल.
वॉशिंग मशीनच्या क्षमतेपेक्षा जास्त कपडे त्यात धुतल्यास मोटर, ड्रम आणि बेअरिंगवर ताण येतो. त्यामुळे त्यात बिघाड होतो. कपडे धुण्यासाठी तुम्ही अतिरिक्त प्रमाणात डिटर्जंट वापरत असाल तर त्यामुळेही तुमचं वॉशिंग मशीन लवकर बिघडू शकतं. जास्त डिटर्जंटमुळे कपडे जास्त चांगले धुतले जातात असं अनेकांना वाटत असतं, प्रत्यक्षात मात्र वापरलेला जादा डिटर्जंट पावडर ही मशिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते, हे लक्षात ठेवा. धुतल्यानंतर उरलेली पावडर मशीनमध्ये तशीच राहते व त्यामुळे मशीन खराब होतं. वॉशिंग मशीन वापरताना लिंट फिल्टर, डिटर्जंट डिस्पेन्सर आणि ड्रम यांची नियमित स्वच्छता करणं आवश्यक आहे. तसं न करणं हे मशीनच्या कामात अडथळा आणू शकतं.
advertisement
मशीनला पाणी पुरवठा करणारा पाईपही चांगल्या अवस्थेत आहे की नाही हे अधूनमधून पाहणं आवश्यक आहे. ब्लँकेट, घोंगडी अशा जाडजूड आणि जड गोष्टी वॉशिंग मशीनमध्ये धुताना काळजी घ्या, अन्यथा मशीन बिघडेल. आपल्या वॉशिंग मशीनचा आवाज कसा येतो हे आपल्याला माहिती असतं. मात्र, नेहमीपेक्षा वेगळा आवाज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तसे आवाज आल्यास मशीनचा वापर थांबवा. नाही तर मशीनमधील बिघाड वाढू शकतो.
advertisement
कपडे लावताना ते नीट एकसारखे लावले जात आहेत ना बघा. एका बाजूला जास्त कपडे, एका बाजूला कमी कपडे असा प्रकार टाळा. नाहीतर वॉशिंग मशीन खूप व्हायब्रेट होतं. त्यामुळे त्यात बिघाड होण्याचा धोका असतो. ओले कपडे बराच वेळ मशीनमध्येच पडून राहाणार नाहीत याची काळजी घ्या. पंप फिल्टरवर साचलेला मळ वेळच्यावेळी स्वच्छ करा. तसं न केल्यास त्रास होऊ शकतो. वापर आणि मेंटेनन्ससाठी कंपनीच्या गाईडलाईन्सचं पालन करा. आवश्यक तेव्हा सर्व्हिसिंग करुन घ्या.
advertisement
वॉशिंग मशीन वापरताना या गोष्टींचं कटाक्षाने पालन केल्यास ते दीर्घकाळ आणि उत्तम चालेल. काळजीपूर्वक वापर आणि वेळच्यावेळी सर्व्हिसिंगमुळे तुमचं मशीन छान चालेल आणि अचानक बंद पडून तुमची गैरसोय करणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2024 3:29 PM IST