Cancer : शरीराच्या 'या' भागात होतायत वेदना, लिव्हर कॅन्सरचा असू शकतो इशारा; वेळीच ओळखा लक्षणं

Last Updated:

यकृत म्हणजेच लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर निरोगी राहिल्यास शरीर निरोगी राहते. पण, आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लिव्हरशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे.

News18
News18
Liver Cancer Symptoms : यकृत म्हणजेच लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर निरोगी राहिल्यास शरीर निरोगी राहते. पण, आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लिव्हरशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे, त्यापैकीच एक म्हणजे लिव्हर कॅन्सर. अनेकदा हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाही, पण शरीराच्या काही भागांमध्ये होणाऱ्या वेदना हे त्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
लिव्हर कॅन्सरची लक्षणे आणि वेदना
उजव्या बाजूला वेदना
लिव्हर शरीराच्या उजव्या बाजूला, फासळ्यांच्याखाली असते. लिव्हरमध्ये ट्यूमर वाढल्यास या भागावर दाब येतो. त्यामुळे, पोटात, विशेषतः उजव्या बाजूच्या वरच्या भागात सतत किंवा अधूनमधून वेदना जाणवू शकतात.
खांद्यात वेदना
लिव्हरचा कॅन्सर वाढल्यास ट्यूमर डायफ्रामवर दाब देतो. यामुळे उजव्या खांद्यात वेदना होऊ शकतात. याला 'रेफर्ड पेन' म्हणतात, जिथे वेदना मूळ जागेपासून दूर जाणवतात.
advertisement
वजन कमी होणे
लिव्हर कॅन्सरचा एक सामान्य संकेत म्हणजे कोणताही प्रयत्न न करता अचानक वजन कमी होणे. यासोबतच भूक कमी लागणे हे देखील एक महत्त्वाचे लक्षण आहे.
पोटात सूज
लिव्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे पोटात द्रव जमा होऊ लागतो, ज्याला 'ॲसाइटिस' म्हणतात. यामुळे पोट फुगलेले दिसते आणि त्यात सूज येते.
पिवळेपणा
त्वचा आणि डोळे पिवळे दिसणे हे लिव्हरच्या बिघाडाचे एक स्पष्ट लक्षण आहे. याला कावीळ म्हणतात. असे झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
अशक्तपणा आणि थकवा
सतत अशक्तपणा, थकवा, आणि ताप येणे ही देखील लिव्हर कॅन्सरची लक्षणे असू शकतात. वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांना सामान्य समजू नका. वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करून घ्या. लवकर निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : शरीराच्या 'या' भागात होतायत वेदना, लिव्हर कॅन्सरचा असू शकतो इशारा; वेळीच ओळखा लक्षणं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement