Amitabh-Jaya Wedding: अमिताभ बच्चनला घाईघाईत करावं लागलं होतं जया सोबत लग्न, कारण वाचून व्हाल शॉक

Last Updated:

Amitabh-Jaya Wedding: बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे ज्येष्ठ कपलपैकी एक आहेत. दोघेही सतत चर्चेत असतात.

अमिताभ बच्चन वेडिंग
अमिताभ बच्चन वेडिंग
मुंबई : बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे ज्येष्ठ कपलपैकी एक आहेत. दोघेही सतत चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाला 50 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांचं लग्न अगदी अचानक आणि घाईघाईत ठरलं होतं. गडबडीत लग्न यामागचं कारण जाणून तुम्हीही शॉक व्हाल.
अमिताभ आणि जया यांची पहिली भेट गुड्डी या चित्रपटाच्या सेटवर झाली. हरिवंश राय बच्चन यांचा मुलगा असल्याने अमिताभकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. जया बच्चन एका मुलाखतीत सांगतात की त्या पहिल्याच नजरेत अमिताभकडे आकर्षित झाल्या.
Rekha: जे जया करु शकली नाही ते रेखानं केलं; अमिताभला खूश करण्यासाठी केलेली ही गोष्ट!
एक नजर (1972) या चित्रपटात काम करताना दोघांमधली मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतरच त्यांच्या नात्याला प्रेमाची रंगत आली. जंजीर चित्रपट त्यांच्या करिअरमध्ये मोठं वळण ठरला. ‘जंजीर’ रिलीज होण्याआधीच मित्रमंडळीनं ठरवलं होतं चित्रपट हिट झाला तर ते लंडनला सहलीसाठी जाणार. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पण जेव्हा अमिताभने आपल्या वडिलांकडे सहलीची परवानगी मागितली तेव्हा हरिवंश राय बच्चन यांनी अट ठेवली “जयाशी लग्न केल्याशिवाय लंडनला जाऊ नकोस.”
advertisement
ही अट ऐकून अमिताभने तात्काळ जयाला लग्नाचा प्रस्ताव दिला. 3 जून 1973 रोजी एका साध्या समारंभात दोघांचं लग्न झालं आणि त्याच संध्याकाळी ते विवाहित जोडपं म्हणून लंडनला रवाना झाले. या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरातील नोकरालाही या समारंभाची कल्पना नव्हती. अमिताभ-जया यांनी सुरुवातीपासूनच नातं फार साधेपणाने आणि प्रामाणिकपणे जपलं.
advertisement
अमिताभ आणि जया यांचं नातं अनेक चढउतारातून गेलं, पण गेल्या पाच दशकांपासून ते एकमेकांसोबत खंबीरपणे उभे आहेत. आजही चाहत्यांसाठी त्यांचं लग्न म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेम, विश्वास आणि समर्पणाचं उदाहरण आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Amitabh-Jaya Wedding: अमिताभ बच्चनला घाईघाईत करावं लागलं होतं जया सोबत लग्न, कारण वाचून व्हाल शॉक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement