Rise And Fall: 'नाहीतर लोक मला तोडून टाकतील', ढसाढसा रडला अरबाज पटेल, नेमकं काय घडलं?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rise and Fall : नुकतंच या शोचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज पटेल ढसाढसा रडताना दिसत आहे.
मुंबई : सध्या बिग बॉससोबतच आणखी एका रिॲलिटी शोची तुफान चर्चा सुरू आहे. हा शो म्हणजे बिझनेसमन अश्नीर ग्रोव्हर होस्ट करत असलेला राईज अँड फॉल. या शोमध्ये रिॲलिटी शो आणि छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळत आहेत. या शोमध्ये किकू शारदा, धनश्री वर्मा, अर्जुन बिजलानी यांसारखी मोठी नावं दिसत आहेत. अशातच बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व गाजवलेला अरबाझ पटेलही या शोमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.
अरबाझ पटेलने पहिल्या दिवसापासूनच या खेळात आपलं स्थान मजबूत केल्याचं पाहायला मिळालं. दिवसेंदिवस या शोमधील ड्रामा वाढत जातोय. अशातच अरबाझ या शोमधील एक मजबूत स्पर्धक म्हणून टॉपवर येतोय. मात्र नुकतंच या शोचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज पटेल ढसाढसा रडताना दिसत आहे. त्याला असं रडताना पाहून घरातले बाकीचे स्पर्धकही हैराण झाले आहेत.
advertisement
ढसाढसा रडला अरबाझ पटेल
आज, मंगळवारी ‘राईज अँड फॉल’चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अरबाज पटेल खूपच दुःखी दिसत आहे आणि त्याचे अश्रू थांबत नाहीत. त्याला असं रडताना पाहून आकृती नेगी आणि धनश्री शॉक झाल्या.
advertisement
व्हिडिओमध्ये अरबाजला विचारलं जातं की, 'काय झालं?' या प्रश्नावर अरबाजने खूपच भावनिक उत्तर दिलं. तो म्हणाला, “मी इथे खेळ खेळायला आलो आहे, वाईट बनायला नाही.” अरबाज पुढे म्हणाला, “मी कोणालाही हे सांगायला आलो नाही की, माझ्यामध्ये खूप अहंकार आहे किंवा मी स्वतःला खूप मोठा समजतो, असं नाहीये. मी जमिनीशी जोडलेला माणूस आहे. थोडा ॲटिट्यूड आहे, जो ठेवावा लागतो, नाहीतर लोक मला तोडून टाकतील.”
advertisement
advertisement
तो म्हणाला की, “लोकांनी माझ्यासाठी द्वेष मनात ठेवू नये. मी खेळ खेळतोय, त्याला खेळासारखं घ्या. मला हे खूप वाईट वाटलं की, लोकांनी म्हटलं माझ्यामध्ये खूप अहंकार आहे.” अरबाजच्या या बोलण्यानंतर इतर स्पर्धकांनाही त्याच्यासाठी वाईट वाटत असल्याचं दिसून आलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rise And Fall: 'नाहीतर लोक मला तोडून टाकतील', ढसाढसा रडला अरबाज पटेल, नेमकं काय घडलं?