Pure Paithani Saree : पैठणी अस्सल आहे की पॉवरलूमवाली? साडीच्या पदरावरून क्षणांत ओळखता येईल..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Identify Pure Paithani Saree : पैठणी कितीही महाग असली तरी आपल्याकडे एकतरी पैठणी साडी असावी अशी स्त्रियांची इच्छा असते. परंतु बाजारात अनेक बनावट पैठणी साड्या देखील विकल्या जातात. तेव्हा यामधून अस्सल पैठणी साडी कशी ओळखावी हे जाणून घेऊयात.
मुंबई : महिला वर्ग आणि पैठणीव साडीच नातं अनोखं आहे. रेशमी धाग्यामध्ये विणली जाणारी पैठणी साडी ही प्रत्येक महिलेला हवीहवीशी वाटते. पैठणी कितीही महाग असली तरी आपल्याकडे एकतरी पैठणी साडी असावी अशी स्त्रियांची इच्छा असते. परंतु बाजारात अनेक बनावट पैठणी साड्या देखील विकल्या जातात. तेव्हा यामधून अस्सल पैठणी साडी कशी ओळखावी हे जाणून घेऊयात.
पैठणींमध्ये दोन प्रकार असतात एक मशीनमेड आणि दुसरी हातमागावर बनवलेली. यापैकी हातमागावर बनवलेली पैठणी ही अस्सल म्हणून ओळखली जाते. हातमागावर बनवलेली अस्सल पैठणी ही महाग असून त्याची किंमत जवळपास 10 हजार पासून सुरु होते. तर मशीनने बनवलेली पैठणी ही तुलनेनं स्वस्त असते.
पदरावरून अशी ओळख अस्सल पैठणी..
अस्सल पैठणीची ओळख या साडीच्या पदरावरून करता येते. तशीच मशीनमेड किंवा पॉवरलूम पैठणीची ओळख सुद्धा तुम्हाला पदरावरून करता येईल. मशीनमेड पैठणीमध्ये पदराच्या दोन्ही बाजूचे धागे उसवल्यासारखे दिसतात. मात्र अस्सल पैठणीवर धागा कुठेच दिसत नाही. म्हणजे उलट सुलट अशा दोन्ही बाजूंनी ही पैठणी पहिली तर ती एकसारखीच दिसते.
advertisement
पैठणी साडीला वेगळे बनवणारी गोष्ट तिची विणण्याची शैलीच असते. पैठणी साडीचे विणकाम गरा भरतकामासारखे असते. त्यात कोणतेही धागे लटकत नाहीत आणि ते सर्व सील केलेले असते आणि अॅक्सेसरीजमध्ये अडकत नाही. तसेच अस्सल पैठणीच्या साडीची बॉर्डर आणि पदर एक सारखा असतो. खऱ्या पैठणीचं वैशिष्ठ्य म्हणजे पैठणीची जर कधीच काळी पडत नाही.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pure Paithani Saree : पैठणी अस्सल आहे की पॉवरलूमवाली? साडीच्या पदरावरून क्षणांत ओळखता येईल..


