Dharmendra Health Update : धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, हेमा मालिनींनी एका शब्दात दिली हेल्थ अपडेट, हात जोडून म्हणाल्या...

Last Updated:

Dharmendra Health Update : अभिनेते धर्मेंद्र यांना नुकतेच मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंतेची लाट पसरली होती.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना नुकतेच मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंतेची लाट पसरली होती. त्यांची तब्येत कशी आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अशातच आता त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या आरोग्याबद्दलचे नवीन अपडेट दिले आहे.
सोमवारी सकाळी हेमा मालिनी यांना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. कारमधून बाहेर पडताच त्यांनी पॅपाराझींना हात जोडून नमस्कार केला आणि 'सगळं ठीक आहे ना?' अशी विचारणाही केली.
यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांना धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल विचारले. तेव्हा हेमा मालिनी यांनी केवळ 'ओके' असे उत्तर दिले, हात जोडले आणि आभार मानले. त्यांच्या या शांत उत्तरामुळे चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी हेमा मालिनी फ्लोरल प्रिंटच्या सुंदर सूटमध्ये दिसल्या. त्यांचे केस मोकळे होते आणि त्यांनी नो मेकअप लूक केला होता.
advertisement
advertisement

रुटीन चेकअप की गंभीर बाब?

शुक्रवारी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. काही रिपोर्ट्सनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते केवळ रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. ८९ वर्षांचे असूनही धर्मेंद्र अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत आणि त्यांचे काम करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.

नुकतेच दोन हिट चित्रपट दिले

advertisement
वर्क फ्रंटवरबद्दल बोलायचं झालं तर धर्मेंद्र यांनी अलीकडेच अनेक हिट चित्रपटांत काम केले. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' मध्ये ते शाहिद कपूर आणि क्रिती सेननसोबत दिसले. करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्टसोबत त्यांनी काम केले. याच चित्रपटातील शबाना आझमीसोबतचा त्यांचा किसिंग सीन खूप गाजला होता.
advertisement
आता ते लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यात अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली असून, हेमा मालिनी यांनी दिलेल्या अपडेटमुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra Health Update : धर्मेंद्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, हेमा मालिनींनी एका शब्दात दिली हेल्थ अपडेट, हात जोडून म्हणाल्या...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement