Rohit Sharma : दोन मुंबईकर! एकाने वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण केलं, दुसरा उघड्या डोळ्यांनी बघत राहिला, रोहितच्या मनात काय चाललं होतं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma vs Amol Muzumdar : टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याच्या डोळ्यासमोर टीम इंडियाच्या पोरींनी वर्ल्ड कप उचलला. त्यावेळी रोहित भावूक झाल्याचं दिसलं.
Mumbai cricketers World Cup Dream : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्याबद्दल सोशल मीडियावर व्यापक चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे रोहित शर्मा देखील ट्रेडिंगला येतोय. त्याला कारण रोहित शर्माची डी.वाय पाटील स्टेडियमवर लावलेली उपस्थिती... रोहित शर्मा आपल्या पोरींना सपोर्ट करण्यासाठी फायनलसाठी उपस्थित होता. तिथं रोहितच्या सिनियर खेळाडूने वर्ल्ड कप उचलला.
रोहितचे प्रशिक्षक ते वर्ल्ड कपची ट्रॉफी
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अमोल मुझुमदार हे दोघेही मुंबई क्रिकेटमध्ये खोलवर रुजलेले आहेत, मुझुमदार यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला शर्माचे नेतृत्व केलं होतं आणि नंतर त्यांच्या नेतृत्व क्षमतेची प्रशंसा केली. मुझुमदार हे एक उत्तम डोमेस्टिक खेळाडू होते जे पुढं जाऊन टीम इंडियाचे प्रशिक्षक बनले, तर रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अत्यंत यशस्वी कामगिरी केली. पण रोहित शर्माला आयसीसीची वनडे वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलता आली नाही.
advertisement
Wow Amol Majumdar recreated the Rohit Sharma flag celebration. pic.twitter.com/Pop4uj0ViP
— R A T N I S H (@LoyalSachinFan) November 3, 2025
रोहित शर्माच्या मनात काय चाललंय? सोशल मीडियावर चर्चा
रोहित शर्मा विजयानंतर नक्कीच आनंद व्यक्त केला. त्यावेळी रोहित भावूक झाल्याचं देखील पहायला मिळालं. रोहितने टीम इंडियाच्या पोरींना सपोर्ट केला. अमोल मुजुमदार यांचं अभिनंदन केलं. पण रोहित शर्माच्या मनात 2027 च्या वनडे वर्ल्ड कपचा विचार नक्की सुरू असेल. रोहितच्या चेहऱ्यावर त्याच्या मनातील इच्छा दिसत होती, असं चाहते सोशल मीडियावर चर्चा करत आहे. 2027 चा वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया रोहितची इच्छा पूर्ण करेल, यात शंका नाही.
advertisement
रोहित आणि मुजुमदार यांचे जिव्हाळ्याचे संबंध
दरम्यान, रोहित शर्मा आणि अमोल मुजुमदार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. रोहित शर्माने अमोल मुजुमदारबद्दल काही वर्षांपूर्वी ट्विट केले होते. अमोल मुजुमदारने सप्टेंबर 2014 मध्ये क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी त्याच्याबद्दल ट्विट करून त्याचे अभिनंदन केले. "मुंबई क्रिकेटचा अनामिक हिरो अमोल मुजुमदार एक जबरदस्त विक्रम मागे सोडून निवृत्त झाला आहे! त्याने नेहमीच त्याचे मन आणि आत्मा त्याच्या खेळात ओतला.", असं रोहितने ट्विटमध्ये लिहिलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : दोन मुंबईकर! एकाने वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण केलं, दुसरा उघड्या डोळ्यांनी बघत राहिला, रोहितच्या मनात काय चाललं होतं?


