'शिवीगाळ करणे गुन्हा ठरत नाही', मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Last Updated:

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवीगाळ करणं हा गुन्हा नसल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे.

News18
News18
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवीगाळ करणं हा गुन्हा नसल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. एका वकिलाविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला. तसेच न्यायालयाने संबंधित गुन्हा रद्द केला आहे. जेव्हा उच्चारलेल्या शब्दातून इतरांचा प्रत्यक्ष अपमान किंवा त्रास झालेला असतो, तेव्हाच तो गुन्हा ठरतो, असं निरीक्षण नागपूर खंडपीठाने मांडलं आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण वकील प्रवीण जाडे यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्यावर मागील वर्षी परतवाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात कलम २९४ (अश्लील शब्दांचा वापर) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अशी कलमं लावण्यात आली होती. याचा विरोध करत जाडे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द करत शिवीगाळ करणं गुन्हा नसल्याचं म्हटलं आहे.
advertisement
तक्रारीनुसार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी एक शिक्षिका आणि त्यांचे वडील भरणपोषणाशी संबंधित खटल्यात न्यायालयात उपस्थित होते. त्या वेळी शिक्षिकेच्या पतीचे वकील प्रवीण जाडे यांनी दोघांना धमकावून अशोभनीय भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षिकेने काही दिवसांनी पोलिसात तक्रार दिली.
प्रवीण जाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून म्हटले की, त्यांच्या विरोधातील आरोप खोटे असून त्यात कोणताही गुन्हेगारी हेतू नाही. कलम २९४ तेव्हाच लागू होते जेव्हा सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती किंवा गाण्यांमुळे इतरांना त्रास होतो; मात्र या प्रकरणात फक्त अपशब्द वापरण्याचा आरोप आहे. न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात ना कलम २९४, ना कलम ५०६ अंतर्गत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. त्यामुळे न्यायालयाने जाडे यांची याचिका मंजूर करून गुन्हा आणि त्यासंबंधित न्यायालयीन कार्यवाही रद्द करण्याचा आदेश दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शिवीगाळ करणे गुन्हा ठरत नाही', मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement