Kurtis Shopping in Mumbai: मुंबईत इथं सुरू आहे मान्सून सेल, प्युअर कॉटन कुर्ती एकाच्या किंमती 4, हे आहे Location
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
प्युअर कॉटनचे कुर्तीज घालायला अनेकांना आवडतात. विविध प्रकारच्या कॉटन कुर्तीजचे जबरदस्त कलेक्शन येथे मिळत आहे.
मुंबई: प्युअर कॉटनचे कुर्तीज घालायला अनेकांना आवडतात. दादरमधील स्वामी मठाच्या गल्लीत, मालवण कट्टा हॉटेलच्या समोरच्या पहिल्या मजल्यावर एक अफलातून शॉप आहे, जिथे तुम्हाला प्युअर कॉटनचे सुंदर आणि दर्जेदार कपडे अतिशय माफक दरात मिळतात. ऑफिसला योग्य असलेले वेअर, कॅज्युअल युजसाठी वन पीस, टू पीस आणि थ्री पीस ड्रेस सेट्स, तसेच स्टायलिश शॉर्ट कुर्तीज असा विविध प्रकारचा कपड्यांचा जबरदस्त कलेक्शन येथे मिळत आहे.
या शॉपमध्ये प्युअर कॉटन कुर्ते फक्त 650 पासून सुरू होतात, जे ऑफिसला घालण्यासाठी परफेक्ट आहेत. याशिवाय 2 पीस सेट 1200 पासून उपलब्ध असून, यामध्ये काही ड्रेसवर थ्रेडवर्क आणि सुबक एम्ब्रॉयडरी देखील केलेली आहे. खास एम्ब्रॉयडरी केलेले आणि युनिक कलरमध्ये असलेले 2 पीस ड्रेस सेट 1450 मध्ये मिळतात जे दिसायला खास आणि घालायला खूपच आरामदायक आहेत.
advertisement
फॅन्सी पार्टी वेअर किंवा सणासाठी काहीतरी खास हवं असेल, तर येथे चंदेरी सिल्कचे थ्री पीस सेट 1850 मध्ये मिळतात. याशिवाय हलकंफुलकं पण एलिगंट लूक देणारे टिश्यू लिननचे ड्रेस मटेरियल्स सुद्धा या दुकानात मिळतात. आणि 31 ऑगस्ट पर्यंत यांच्याकडे मान्सून सेल सुरू असणार आहे. सगळ्या ड्रेसेस वर 10 टक्के डिस्काउंट आहे.
advertisement
दुकान मंगळवार ते रविवार दरम्यान सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडे असते. सोमवारी दुकान बंद असते. तुम्ही जर कपड्यांमध्ये चॉईस, क्वालिटी आणि बजेट या तिन्ही गोष्टी शोधत असाल, तर दादरमधील या शॉपला एकदा तरी भेट द्या. इथे एकाच छताखाली तुम्हाला ऑफिस वेअरपासून ते पारंपरिक आणि ट्रेंडी ड्रेस मटेरियल्सपर्यंत सर्व काही मिळेल तेही अगदी वाजवी दरात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2025 3:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kurtis Shopping in Mumbai: मुंबईत इथं सुरू आहे मान्सून सेल, प्युअर कॉटन कुर्ती एकाच्या किंमती 4, हे आहे Location