त्वचा उजळण्याचा ‘हा’ आहे बेस्ट उपाय, घरगुती पद्धतीनं सुटतील अनेक प्रश्न
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्या किंवा ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर आठवड्यातून एकदा हा उपाय केलाच पाहिजे.
वर्धा, 29 सप्टेंबर : चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी आणि चेहरा चमकदार करण्यासाठी अनेक उपाय केले जातात त्यातीलच एक घरगुती आणि सोप्पा उपाय म्हणजे स्टीम घेणे..फेस स्टीम घेणे खूप महत्वाचे आहे. आपण आठवड्यातून एकदा फेस स्टीम घेतल्यास आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात असं ब्युटीशयन सांगतात.
तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, सुरकुत्या किंवा ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायलाच पाहिजे.वाफ घेताना गरम पाण्यात कोणती पाने ऍड केली तर जास्त फायदा मिळू शकतो याबाबत सविस्तर माहिती वर्ध्यातल्या ब्युटीशयन वैशाली चांदेकर यांनी दिलीय.
advertisement
1) स्टीम घेणे चेहऱ्यासाठी एक चांगला उपाय मानला जातो.. घरच्या घरी चेहरा खोलवर आतून स्वच्छ करायचा असेल तर स्टीम हा एक सोपा उपाय नक्कीच करावा. स्टीम घेत असताना गरम पाण्यात कडूलिंबाची पानं त्यात टाकली तर चेहरा स्वच्छ होण्यास मदत होईल..
2) हल्ली प्रत्येकाचाच चेहरा सतत धूळ घाण आणि प्रदूषण यामुळे काळवंडतो. चेहऱ्यावरची ही धूळ काढणे आवश्यक आहे. त्यासाठी गरम पाण्यात स्टीम घेत असताना त्या तुळशीची पानं तोडून टाकली तर नक्कीच फायदा होऊ शकतो, असे ब्युटीशियन चांदेकर यांनी सांगितलं.
advertisement
जास्त प्रमाण टाळा
स्टीम घेत असताना कमीत कमी सहा इंचाचं अंतर गरम पाणी आणि आपल्या चेहऱ्यात असावं.. खूप जास्त स्टीम घेतल्यास चेहऱ्यावर टॅनिंगही येऊ शकतं असा सल्ला चांदेकर यांनी दिलाय.
चेहऱ्यावर स्टीम झाल्यानंतर चंदनाचा फेस पॅक लावला तर सुरक्षित राहण्यास मदत होते जर तुम्हालाही चेहऱ्यावर चमक आणायची असेल आणि घरच्या घरी चेहरा क्लीन करायचा असेल तर चांदेकर यांनी सांगितलेल्या घरगुती टिप्स तुम्ही नक्की फॉलो करू शकता.
advertisement
टीप : या बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. News18 मराठी त्याची हमी देत नाही.
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
September 29, 2023 11:14 AM IST

              