advertisement

सुनील गावस्कर अयोध्येत! रामलल्लाचे आणि हनुमानगढच्या मारुतीचे दर्शन घेऊन सांगितली ही गोष्ट

Last Updated:

सुनील गावस्कर गुपचूप अयोध्येत पोहोचले होते त्यांच्या दौऱ्याची कुणालाही कल्पना नव्हती. सिद्ध पीठ हनुमानगडमध्ये भगवान राम आणि पवन पुत्र हनुमानाचे दर्शन त्यांनी घेतले.

News18
News18
सर्वेश श्रीवास्तव
अयोध्या: प्रभू राम अयोध्येत विराजमान झाल्यापासून देश-विदेशातून दररोज लाखो रामभक्त दर्शनासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी कर्णधार आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर देखील आज अयोध्येत पोहोचले. रामजन्मभूमी परिसरात असलेल्या रामलल्लाच्या भव्य मंदिराला भेट देऊन पूजा केली आणि मंदिरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर सुनील गावस्कर उत्साही दिसले आणि त्यांनी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून मंदिर उभारणीशी संबंधित सविस्तर माहिती घेतली.
advertisement
सुनील गावस्कर यांनी चंपत राय यांच्याशी तासभर संवाद साधला आणि त्यानंतर ते पवनपुत्र हनुमानाच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद ही घेतले. त्यांचा अयोध्या दौरा पूर्णपणे गोपनीय होता. दर्शनानंतर सुनील गावस्कर म्हणाले, "खूप छान वाटलं, धन्यता वाटली. रामलल्लाचे आशीर्वाद मिळणे हा खूप सुखद अनुभव आहे."
11 कोटी लोकांनी दिली भेट 
खरं तर सुनील गावस्कर गुपचूप अयोध्येत पोहोचले होते, जिथे त्यांनी सिद्ध पीठ हनुमानगडमध्ये भगवान राम आणि पवन पुत्र हनुमानाचे दर्शन घेतले होते. त्यांनी राम मंदिरात एक तासाहून अधिक काळ मुक्काम केला आणि ट्रस्टच्या सरचिटणीसांशी मंदिर उभारणीसंदर्भात चर्चा केली. प्रभू राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 11 कोटी लोकांनी अयोध्येला भेट दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सुनील गावस्कर अयोध्येत! रामलल्लाचे आणि हनुमानगढच्या मारुतीचे दर्शन घेऊन सांगितली ही गोष्ट
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement