Health : फिटही राहायचंय अन् कॅन्सरपासूनही हवीय सुटका? आजपासूनच सुरु करा 'या' 2 एक्सरसाइज

Last Updated:

व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो हे सर्वांना माहीत आहे. पण, नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनातून असे समोर आले आहे की, काही खास प्रकारचे व्यायाम थेट कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून बचाव करू शकतात.

News18
News18
Exercise That Prevent Cancer : व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो हे सर्वांना माहीत आहे. पण, नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनातून असे समोर आले आहे की, काही खास प्रकारचे व्यायाम थेट कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून बचाव करू शकतात. हा शोध आरोग्य क्षेत्रात एक मोठी क्रांती मानली जात आहे.
कॅन्सरपासून बचावासाठी 2 महत्त्वाचे व्यायाम
वेट ट्रेनिंग
स्क्वॅट्स, पुश-अप्स आणि डंबेल वापरून केले जाणारे व्यायाम. हे व्यायाम शरीराच्या स्नायूंना मजबूत करतात आणि त्यांची वाढ करतात.
कसे होते फायदे?
वेट ट्रेनिंगमुळे शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच, हे व्यायाम शरीरातील चरबी कमी करतात, जे कॅन्सरच्या अनेक प्रकारांचे एक प्रमुख कारण आहे.
advertisement
ॲरोबिक व्यायाम
जोरदार चालणे (Brisk Walking), धावणे, सायकलिंग आणि पोहणे यांसारखे व्यायाम. हे व्यायाम हृदयाचे ठोके वाढवतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारतात.
कसे होते फायदे?
ॲरोबिक व्यायामामुळे शरीरातील सूज आणि दाह कमी होते. तसेच, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे शरीर कर्करोगाच्या पेशींशी अधिक प्रभावीपणे लढू शकते.
दोन्हीचा समतोल आवश्यक
केवळ एकच व्यायाम पुरेसा नाही. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी दोन्ही प्रकारचे व्यायाम एकत्र करणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातून किमान १५० मिनिटे ॲरोबिक आणि २-३ दिवस वेट ट्रेनिंग करा.
advertisement
नियमितता आहे गुरुकिल्ली
या दोन्ही व्यायामांचा नियमितपणे सराव करणे महत्त्वाचे आहे. सातत्य राखल्यास शरीराला अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. तुम्हाला फिट राहण्यासोबतच कॅन्सरपासून दूर राहायचे असेल, तर तुमच्या दैनंदिन जीवनात (Daily Life) या दोन प्रकारच्या व्यायामांचा समावेश नक्की करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health : फिटही राहायचंय अन् कॅन्सरपासूनही हवीय सुटका? आजपासूनच सुरु करा 'या' 2 एक्सरसाइज
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement