Nashik Traffic: सोमवारपासून नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, हे प्रमुख रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Nashik Traffic: नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Nashik Traffic: सोमवारपासून नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, हे प्रुमुख रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
Nashik Traffic: सोमवारपासून नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, हे प्रुमुख रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
नाशिक: आगामी नवरात्रौत्सवात नाशिकच्या ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिराच्या परिसरात नऊ दिवसीय यात्रोत्सव भरतो. या पार्श्वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सोमवारी, 22 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत गडकरी चौक ते मुंबईनाका आणि चांडक सर्कल ते संदीप हॉटेल चौफुलीपर्यंतच्या मार्गावर तसेच पर्यायी जोड मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना 10 दिवस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
नाशिक मधील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर दरवर्षी नवरात्रीत मोठी यात्रा भरते. यात्रेदरम्यान भाविकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे प्रमुख पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार वरील मार्गावर 22 सप्टेंबरपासून 10 दिवस दिवस पूर्ण वेळ वाहतूक बंद करण्यात येणार आहे. विजयादशमी पर्यंत है निर्बंध लागू राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
advertisement
शहरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग
गडकरी चौक सारडा सर्कलमार्गे किंवा गडकरी चौक-एलआयसी- चांडक सर्कलमार्गे तुपसाखरे लॉन्स रस्त्याने पुढे मुंबईनाक्याकडे वाहने मार्गस्थ होतील.
मायको सर्कलकडून राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र, तिडके कॉलनी, नंदिनी पुलावरून पुढे आरडी सर्कलवरून गोविंदनगर रस्त्याने इंदिरानगर बोगद्याकडे वाहने जातील.
advertisement
चांडक सर्कल येथून मुंबईनाक्याकडे जाणारी वाहतूक सरळ गडकरी चौक सिग्नलपर्यंत जाईल. या ठिकाणाहून शिंगाडा तलाव मार्गे द्वारकेकडे रवाना होतील.
सर्व एसटी बसेस, सिटी लिंक बसेससह अन्य वाहने त्र्यंबकनाका सिग्नलवरून जिल्हा परिषदेसमोरून खडकाळी सिग्नल येथून सारडासर्कलमार्गे द्वारकेला जातील.
मुंबईनाक्याकडून येणारी सर्व वाहने महामार्ग बसस्थानकाच्या बाहेरील टॅक्सी थांबा येथून तुपसाखरे लॉन्ससमोरून सरळ मायको सर्कलकडे जातील.
advertisement
अंबड-सातपूर एमआयडीसीमध्ये जाणारी जड/अवजड वाहने द्वारका येथून महामार्गान थेट गरवारे चौकातून पुढे जातील.
पंचवटीत जाणारी वाहतूक ही द्वारका येथून कन्नमवार पुलावरून पुढे रवाना होईल. सारडासर्कलकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने कृषी विभागाच्या कार्यालयाजवळून वळण घेत एन. डी. पटेल रस्त्याने साठे चौकातून त्र्यंबकनाका सिग्नलकडे जातील.
त्र्यंबकरोड सिग्नल ते गडकरी सिग्नल या मार्गावरील आदिवासी आयुक्तालयासमोर अगोदरच यात्रोत्सव काळात येणाऱ्या भाविकांनी उपरोक्त मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा या काळात वापर करावा. कोणीही निर्बंधाचे उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान, बिन्हाड आंदोलकांनी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून आपले ठाण मांडले आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच नवरात्रोत्सव काळात कालिका देवी यात्रा सुरु होत असल्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Traffic: सोमवारपासून नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, हे प्रमुख रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement