Navratri Puja Vidhi 2025 : घटस्थापना कशी करावी? विधीवत पूजा करून असा बसवा देवीचा घट...!

Last Updated:

अवघ्या काहीच दिवसावर शारदीय नवरात्र उत्सव हा सर्वी कडे मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणार सजणार होणार आहे. तर या नवरात्री उत्सवात देवीची पूजा कशा प्रकारे करावी घट कशा प्रकारे बसववेत या बद्दल आपण काही माहिती नाशिक येथील धर्म अभ्यासक समीर जोशी यांच्या कडून लोकल 18 च्या माध्यमातून जाणून घेउया.

+
शारदीयनवरात्री

शारदीयनवरात्री उत्सवाचे महत्व.

अवघ्या काहीच दिवसावर शारदीय नवरात्र उत्सव हा सर्वी कडे मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणार सजणार होणार आहे. तर या नवरात्री उत्सवात देवीची पूजा कशा प्रकारे करावी घट कशा प्रकारे बसववेत या बद्दल आपण काही माहिती नाशिक येथील धर्म अभ्यासक समीर जोशी यांच्या कडून लोकल १८ च्या माध्यमातून जाणून घेउया.
नवरात्रीची कहाणी अध्यात्मात  काही अशी आहे पृथ्वीवर महिषाशूर नावाच्या राक्षसाने संपूर्ण ठियाकणी हाहाकार माजवला होता. देव सुद्धा या राक्षसाचा सामनान करू शकत असल्याचे समजतात. ब्रह्मा विष्णु आणि महेश या त्रिदेवानी आदिशक्ती आदिमायाचे  स्वरूप निर्माण केले आणि या नंतर देवीने संपूर्ण नऊ दिवस महिषासुर या रक्षासोबत युद्ध केले आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला राक्षसाचा वध करून या पृथ्वीला आणि सर्वांना निर्भय केले. या नंतर देवीची विश्रांती आणि आराधना करण्यास्थी हा  नवरात्री उत्सव सर्जर करण्यास सुरवात झाली. तसेच नवरात्रोत्सव वर्षातून दोनदा साजरा केला जातो. पहिली नवरात्र चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते आणि नवमीपर्यंत साजरी केली जाते.
advertisement
पितृपक्ष संपल्यानंतर अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते. दोन्ही नवरात्रांमध्ये भक्त पूर्ण भक्तिभावाने दुर्गा देवीची पूजा करताना नऊ उपवास करतात. शारदीय नवरात्रीचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्या ऋतूमध्ये शारदीय नवरात्रीची सुरुवात होते, त्या ऋतूमध्ये सौम्य थंडी असते आणि त्यामुळे बदलत्या हवामानाचा जनजीवनावर परिणाम होऊ नये, यासाठी नियम व संयम पाळून 9 दिवस उपवास करण्याचा नियम पौराणिक आहे आणि अनादी काळापासून चालत आले आहे. नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करून मानसिक आणि शारीरिक संतुलन साधण्याचा सण. नवरात्रीचे व्रत पाळल्याने उपासक ऋतू बदल सहन करण्यास स्वतःला बळ देतो.
advertisement
नवरात्रात काय करावे?
नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्र महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते. 
advertisement
घट कसा बसवावा ?
घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते. सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी. काहीजण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा. विड्याची पाने, लाल धागा,सात प्रकारचे धान्य,तांदूळ,सुपारी,विडा,पाच फळे,नारळ,तांब्याचा कलश,चौरंग,लाल वस्त्र,फुले,हार,दिवा,अगरबत्ती,धूप,रांगोळी
advertisement
घटस्थापनेची पद्धत
चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे. त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे. मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा. कलशाला हळदकुंकू लावावे. त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारची धान्य पेरावीत त्यावर मातीचा कलश ठेवावं कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा. नारळाला हळदीकुंकू लावावे. कलशाला लाल धागा बांधावा. लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी. हा घट देवी समोर बसवावा. त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करुन धूप, दीप,अगरबत्ती लावून पूजा करावी. नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri Puja Vidhi 2025 : घटस्थापना कशी करावी? विधीवत पूजा करून असा बसवा देवीचा घट...!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement