Success Story : शहराला पहिल्यांदा मिळाली लेडी बॉस, धाडसी निर्णयाने इतिहास घडवला

Last Updated:

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तब्बल 136 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला फायर फायटर म्हणून त्यांची निवड झाली आहे. मनपा स्थापनेच्या 74 वर्षांत ही पहिलीच वेळ आहे की एका महिलेला अशा पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

+
मेघना 

मेघना 

पुणे : आज महिला आणि मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी येतो. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिलांनी आपली कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. अशाच प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे पुण्यातील मेघना महेंद्र सपकाळ यांची. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तब्बल 136 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला फायर फायटर म्हणून त्यांची निवड झाली आहे. मनपा स्थापनेच्या 74 वर्षांत ही पहिलीच वेळ आहे की एका महिलेला अशा पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. या यशामागे मेघनाची जिद्द, कुटुंबाचा वारसा आणि कठोर परिश्रम आहे.
मेघना सपकाळ यांचा फायर ब्रिगेडशी संबंध लहानपणापासूनच होता. त्यांचे आजोबा निवृत्त फायरमन असून, वडील जनता फायर स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कामकाज, आव्हाने आणि परीक्षांची माहिती त्यांना अगदी लहानपणापासून मिळत होती. 2019 मध्ये त्यांनी भरती प्रक्रियेसाठी तयारी सुरु केली आणि 2020 मध्ये अधिकृत प्रशिक्षणाला सुरुवात केली. या काळात वडिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना बळ दिले.
advertisement
सध्या मेघना गेल्या एका वर्षापासून पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात कार्यरत आहेत. कंट्रोल रूममध्ये काम करताना त्यांना वेगवेगळ्या घटनांची माहिती मिळते. कोणती गाडी कुठे पोहोचली, कोणत्या कॉलला प्रतिसाद द्यायचा. यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. त्यांच्या या यशामुळेच समाजातल्या अनेक महिलांना आणि तरुणींना प्रेरणा मिळत आहे. मेघनाला पाहून अनेकांना वाटते की आपणही या क्षेत्रात पाऊल ठेवावे, हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे.
advertisement
विशेष म्हणजे, बार्बी ब्रँडनेही त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करत मेघनाला विशेष सन्मान दिला आहे. तिसऱ्या पिढीचा वारसा पुढे नेत आणि स्वतःचा ठसा उमटवत त्यांनी अग्निशमन दलाच्या इतिहासात नवे पर्व लिहिले आहे. मेघना सपकाळ यांचा प्रवास फक्त त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर समाजातील असंख्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Success Story : शहराला पहिल्यांदा मिळाली लेडी बॉस, धाडसी निर्णयाने इतिहास घडवला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement