Carrot Gulabjam Recipe : चव आणि पोषणाचा अनोखा संगम! तुम्ही कधी 'गाजर गुलाबजाम' खाल्ले का? पाहा सोपी रेसिपी

Last Updated:

Healthy And Tasty Carrot Gulabjam Recipe : आजकाल लोक आरोग्याकडे अधिक लक्ष देत असल्याने पारंपरिक मिठाईला हेल्दी ट्विस्ट देण्याचा ट्रेंडही वाढला आहे. अशाच एका चविष्ट आणि पोषक ट्विस्टचं नाव आहे, गाजर गुलाबजामुन!

गाजर गुलाबजाम तयार करण्याची पद्धत
गाजर गुलाबजाम तयार करण्याची पद्धत
मुंबई : भारतीय मिठाईंच्या दुनियेत गुलाबजामुन हे नाव ऐकले की तोंडाला आपोआप पाणी सुटते. पण आजकाल लोक आरोग्याकडे अधिक लक्ष देत असल्याने पारंपरिक मिठाईला हेल्दी ट्विस्ट देण्याचा ट्रेंडही वाढला आहे. अशाच एका चविष्ट आणि पोषक ट्विस्टचं नाव आहे, गाजर गुलाबजामुन! गाजरातील व्हिटॅमिन्स, मावा आणि सुगंधी वेलची यामुळे ही मिठाई स्वादिष्टच तुलनेने अधिक पौष्टिकही ठरते. सण-उत्सव, पाहुणचार किंवा मुलांना काही खास देण्यासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.
गाजराचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
गाजर - 2 कप (उकडून कुस्करलेले/किसलेले)
खवा / मावा - 1 कप
मैदा - 2 ते 3 टेबलस्पून
साखर - 1 कप
पाणी - 1 कप
वेलची पावडर - ½ टीस्पून
तूप किंवा तेल - तळण्यासाठी
पिस्ता/बदाम - सजावटीसाठी
गाजर गुलाबजाम तयार करण्याची पद्धत
- सर्वप्रथम चाशनी तयार करा. यासाठी कढईत साखर आणि पाणी घालून गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर एक तारी पाक तयार होईपर्यंत शिजवा. त्यात थोडीशी वेलची पावडर घाला आणि पाक बाजूला ठेवा.
advertisement
- यानंतर गाजर-खव्याचे मिश्रण शिजवा. यासाठी उकडून किसलेले गाजर कढईत 2-3 मिनिटे हलकेसे परतून घ्या. आता त्यात मावा घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून एकसारखा, मऊसर गोळा मळून घ्या. या मिश्रणाचे छोटे-छोटे गोल गुलाबजामुनचे गोळे तयार करा.
advertisement
- आता पाण्याची वेळ आहे. कढईत तूप किंवा तेल गरम करा. मंद आचेवर हे गोळे सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. तळताना आच कमी ठेवा म्हणजे जामुन छान फुलतात आणि आतूनही मऊ होतात.
- यानंतर तळलेले गुलाबजाम पाकात भिजवा. गरम गरम जामुन तयार पाकात 15-20 मिनिटे भिजवत ठेवा. त्यामुळे पाक छान आतपर्यंत जातो आणि गुलाबजाम मऊ, रसाळ होतात.
advertisement
- वरून चिरलेले पिस्ते/बदाम घालून सजवा. गरम किंवा हलके थंड झालेले गाजर गुलाबजामुन सर्व्ह करा.
गाजर गुलाबजामचे फायदे
गाजरामुळे मिठाईत नैसर्गिक गोडवा वाढतो. तुपात तळले तरी मावा आणि गाजरामुळे ते तुलनेने हलके लागतात. मुलांनाही हा हेल्दी ट्विस्ट असलेला मिठाई प्रकार विशेष आवडतो. सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठी खास आणि वेगळा पर्याय.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Carrot Gulabjam Recipe : चव आणि पोषणाचा अनोखा संगम! तुम्ही कधी 'गाजर गुलाबजाम' खाल्ले का? पाहा सोपी रेसिपी
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement