Home Remedy : युरिक ॲसिडचा त्रास सहज होईल दूर! फक्त रोजच्या जेवणात 'या' हिरव्या चटणीचा करा समावेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Chutney Which Helps In Uric Acid : युरिक ॲसिड ही शरीरातील एक प्रकारची घाण आहे, जी प्युरीन नावाच्या प्रोटीनच्या विघटनातून तयार होते. सामान्यतः यकृत (लिव्हर) ते फिल्टर करून लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकते. मात्र, युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त वाढले तर सांध्यांमध्ये सतत वेदना आणि सूज येण्याची समस्या निर्माण होते.
मुंबई : आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे शरीरात युरिक ॲसिड वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. जेव्हा शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते, तेव्हा ते स्फटिकांच्या स्वरूपात सांध्यांमध्ये साचू लागते. यामुळे तीव्र वेदना, सूज आणि चालताना अडचण येते. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल, तर तुमच्या स्वयंपाकघरातली कोथिंबीर तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते.
कोथिंबीर केवळ पदार्थांची चव वाढवते असे नाही, तर ती औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन K मुबलक प्रमाणात असतात. तिच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. कोथिंबिरीची चटणी युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, कारण ती औषधासारखी काम करते. या चटणीचे सेवन केल्याने लघवीचे प्रमाण वाढते आणि युरिक ॲसिड सहजपणे शरीरातून बाहेर पडते.
advertisement
हेल्थ स्पेशल चटणी कशी बनवावी?
सामान्य चटणीपेक्षा ही हेल्थ स्पेशल चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केली जाते, जेणेकरून तिचा जास्तीत जास्त फायदा मिळेल. युरिक ॲसिडसाठी खास ‘हिरवी चटणी’ बनवण्यासाठी ताजी कोथिंबीर, आल्याचा छोटा तुकडा, हिरव्या मिरच्या, थोडे जिरे आणि सैंधव मीठ घ्या. सर्वप्रथम कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने नीट धुवून घ्या. त्यानंतर त्यात आले, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, हिंग आणि थोडे पाणी घालून नीट वाटून घ्या. दगडी खलबत्त्यात वाटलेली चटणी अधिक चविष्ट लागते, मात्र तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी ही चटणी रोज सकाळ-संध्याकाळ जेवणासोबत खाऊ शकता. डाळ, पोळी आणि सॅलडसोबत घेतल्यास ती अधिक फायदेशीर ठरते.
advertisement
हिरव्या चटणीचे आयुर्वेदिक फायदे
या चटणीचे सेवन केल्याने केवळ वेदनाच नाही, तर अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो. कोथिंबीर किडनीचा फिल्टरेशन रेट सुधारते, त्यामुळे युरिक ॲसिड लघवीद्वारे सहज बाहेर पडते. सांध्यांतील लालसर सूज आणि जळजळ कमी करण्यासही ही चटणी मदत करते. आले आणि कोथिंबिरीचे मिश्रण मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे युरिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी फक्त चटणी पुरेशी नाही; त्यासोबत भरपूर पाणी पिणे आणि डाळी, मांस, सीफूड असे प्युरीनयुक्त पदार्थांचे यांचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. चटणीप्रमाणेच कोथिंबिरीचे पाणीही अतिशय प्रभावी ठरते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Home Remedy : युरिक ॲसिडचा त्रास सहज होईल दूर! फक्त रोजच्या जेवणात 'या' हिरव्या चटणीचा करा समावेश









