Weight Loss Tips : वजन कमी करताना पोटावरील चरबी कमी होत नाहीये? पाहा यामागचे अचूक कारण..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Why You’re Not Losing Belly Fat : तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर पोटाची चरबी आणि मांड्यांची चरबी कशी वेगळी असते आणि त्यातील कोणती चरबी कमी करणे अधिक सोपे असू शकते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो की, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेऊनही त्यांच्या पोटावर किंवा मांड्यांवर साठलेली चरबी कमी होत नाही. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर पोटाची चरबी आणि मांड्यांची चरबी कशी वेगळी असते आणि त्यातील कोणती चरबी कमी करणे अधिक सोपे असू शकते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग, या दोन भागांमधील चरबी कशी वाढते आणि ती कशी कमी होते हे सविस्तर पाहूया.
पोटावरील चरबी कमी करणं अवघड का असतं?
संपूर्ण शरीराप्रमाणेच पोटाभोवती चरबी जमा होण्याचे मुख्य कारण म्हणजे, शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचा वापर करणे. जेव्हा तुम्ही जास्त कॅलरीज घेता, तेव्हा अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. 'कॉस्मोपॉलिटन' नुसार, महिलांच्या शरीरात पुरुषांपेक्षा सरासरी 6 ते 11 टक्के जास्त चरबी असते. यामागे इस्ट्रोजन हे हार्मोन कारणीभूत असते. या हार्मोनमुळे महिलांच्या शरीरात जेवणानंतर ऊर्जा कमी प्रमाणात वापरली जाते आणि जास्त चरबी पोट किंवा मांड्यांवर साठवली जाते.
advertisement
आपल्या शरीरात अल्फा आणि बीटा असे दोन प्रकारचे फॅट सेल्स असतात. हे दोन्ही सेल्स चरबीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. 'बुपा यूके' चे डॉ. ल्युक जेम्स यांच्या मते, ज्या भागात बीटा फॅट सेल्स जास्त असतात, तेथील अतिरिक्त चरबी कमी करणे अधिक कठीण असते. डॉ. ल्युक सांगतात, 'जेव्हा तुम्ही चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा आधी तुमच्या पाय, चेहरा आणि हातांवर बदल दिसून येतो. कारण या भागांमध्ये अल्फा सेल्स जास्त असतात.'
advertisement
याउलट, मांड्या, हिप्स आणि पोटासारख्या भागांमध्ये बीटा सेल्स जास्त असल्याने येथील चरबी कमी होण्यास वेळ लागतो. याशिवाय, हार्मोन्स, जीन्स आणि चयापचय यांसारखे इतर घटकही पोटावरील चरबीसाठी कारणीभूत असू शकतात.
मांड्यांवरील कशी वेगळी असते?
मांड्यांच्या भागातही बीटा सेल्स जास्त असल्यामुळे येथील चरबी कमी करणे कठीण असते. महिलांसाठी हे अधिक आव्हानात्मक असते, कारण गर्भधारणेसाठी मांड्या आणि हिप्सवरील चरबी महत्त्वाची असते, ज्यामुळे ही चरबी शरीराला चिकटून राहते. 'हेल्थलाईन' नुसार, मांड्यांवरील चरबी केवळ व्यायामाने कमी करता येत नाही. यासाठी योग्य आहाराचे पालन करणे आणि केवळ मांड्यांवर लक्ष केंद्रित करणारे विशेष व्यायाम करणे आवश्यक आहे.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss Tips : वजन कमी करताना पोटावरील चरबी कमी होत नाहीये? पाहा यामागचे अचूक कारण..