चुकीला माफी नाही... बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Pune Murder: इंजिनिअर नातवाला संपवणाऱ्या बंडू आंदेकरवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पुणे : माजी नगससेवक वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने आपल्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या नातवाची पुण्याची मध्यवर्ती भागात हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह तेरा जणांवर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली.
सूर्यकांत बंडू अण्णा आंदेकर (वय 70,), तुषार नीलंजय वाडेकर (वय 27), स्वराज नीलंजय वाडेकर (वय 23), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय 40) यांना अटक केली आहे. अमन युसुफ पठाण (वय 25, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुलू मेरगु (वय 20, भवानी पेठ) या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली. सिद्धेश्वर पाटील (वय 19) आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19, दोघेही रा. नाना पेठ) यांना यापूर्वी या गुन्ह्यात यश अटक केली आहे. असे मिळून या गुन्ह्यात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.
advertisement
आंदेकर टोळीवर आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर टोळीच्या 11 जणांवर मकोका कारवाईसाठीचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडून मंजूर करण्यात आला आहे. हा कायदा लावल्यानंतर सहजासहजी जामीन मिळत नाही.
काय आहे मकोका?
महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम अॅक्ट म्हणजेच मकोका कायदा संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी १९९९ मध्ये आणला. त्यापूर्वी असलेल्या टाडा कायद्याच्या धर्तीवर मकोका हा कायदा आणला गेला. हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, हत्या, सामुहिक गुन्हेगारी या विरोधात मकोका लावला जातो.
advertisement
मकोका कायदा एकापेक्षा जास्त आरोपी टोळी म्हणून गुन्हे करत असतील तेव्हा लावला जातो. या कायद्यात पोलिसांना 180 दिवस दोषारोपत्र दाखल करण्यासाठी मिळतात. हा कायदा लावल्यानंतर आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही. मकोका कायदा केव्हा लावला जातो एका आरोपीवर दोन पेक्षा जास्त आरोपपत्र त्यापूर्वी दाखल असतील, तेव्हाच हा कायदा लावला जातो. मकोको कायदा फरार आरोपीवर लावता येते. त्याची संपत्ती जप्त करता येते. त्याची बँक खाती गोठवता येता
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 10, 2025 8:25 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
चुकीला माफी नाही... बंडू आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वांत मोठी कारवाई