क्रिकेट वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना,स्टार क्रिकेटर्सना बंदूकीच्या धाकेवर लुटलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दोन स्टार खेळाडूंना आणि अधिकाऱ्याला बंदुकीच्या धाकेवर लुटल्याची घटना घडली आहे.या घटनेने खेळाडूंमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच या घटनेने खळबळ माजली आहे.
CPL 2025 : आशिया कपच्या दुसऱ्या दिवशी आज टीम इंडिया आणि युएईमध्ये सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. दोन स्टार खेळाडूंना आणि अधिकाऱ्याला बंदुकीच्या धाकेवर लुटल्याची घटना घडली आहे.या घटनेने खेळाडूंमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच या घटनेने खळबळ माजली आहे.
कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.9 सप्टेंबरला पहाटे सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सचे दोन खेळाडू आणि सीपीएलच्या एका अधिकाऱ्याला बंदुकीच्या धाकावर लुटल्याची घटना घडली आहे. हे खेळाडू एका खाजगी कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार,दरोडेखोरांनी दागिने आणि मौल्यवान वस्तूंची चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.या दरम्यान त्यांनी खेळाडूंकडून मौल्यवान वस्तु चोरून घेण्यासाठी त्यांच्यावर बंदूक रोखली होती. सुदैवाने या घटनेत कोणत्याही खेळाडूला दुखापत झालेली नाही आहे.या घटनेनंतर अधिकारी आणि खेळाडूंची नावे उघड करण्यात आलेली नाहीयेत. पण या घटनेने परिसरात खळबळ माजी आहे.
advertisement
बार्बाडोस पोलिसांनी पुष्टी केली की, बंदूक जप्त करण्यात आले आहे आणि अज्ञात आरोपींची ओळख पटविण्याचे काम सूरू आहे. दरम्यान, पॅट्रियट्सने आश्वासन दिले आहे की त्यांचे खेळाडू आणि सीपीएल कर्मचारी सुरक्षित आहेत आणि पोलिसांना सहकार्य करत आहेत.
पॅट्रियट्स 11 सप्टेंबर रोजी केन्सिंग्टन ओव्हल येथे बार्बाडोस रॉयल्स विरुद्धच्या त्यांच्या आगामी सामन्यासाठी तयारी करत आहेत, जरी संघाभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे आणि देखरेख वाढविण्यात आली आहे.फ्रँचायझीने चौकशीदरम्यान गोपनीयता राखून या घटनेत अडकलेल्यांची ओळख उघड न करण्याचा निर्णय घेतला आहे.या घटनेने खळबळ माजली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 8:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
क्रिकेट वर्तुळाला हादरवून टाकणारी घटना,स्टार क्रिकेटर्सना बंदूकीच्या धाकेवर लुटलं, नेमकं काय घडलं?