Women Health : महिलांमध्ये का वाढतो PCOD किंवा PCOS चा धोका? डॉक्टरांनी सांगितली 3 महत्वाची कारणं, एक तर धक्कादायक!

Last Updated:

आजकाल महिलांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर. वैद्यकीय भाषेत ही स्थिती हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते.

News18
News18
Major Reasons Of PCOD And PCOS : आजकाल महिलांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर. वैद्यकीय भाषेत ही स्थिती हार्मोनल असंतुलनामुळे उद्भवते. गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, ज्याची प्रमुख कारणे जीवनशैली आणि आहार आहेत.
काय आहे पीसीओडी आणि पीसीओएस?
पीसीओडी
हा एक सामान्य हार्मोनल विकार आहे, ज्यामुळे अंडाशयात अनेक लहान गाठी तयार होतात. यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि शरीरात पुरुष हार्मोन्स वाढतात.
पीसीओएस
हा एक सिंड्रोम आहे, जो पीसीओडीपेक्षा अधिक गंभीर असतो. यात हार्मोनल असंतुलनामुळे शरीरातील चयापचय क्रिया बिघडते, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि वंध्यत्व यांसारख्या समस्या येऊ शकतात.
advertisement
महिलांमध्ये का वाढतोय 'हा' आजार?
हेल्थ, न्यूट्रिशन आणि वेलनेस एक्स्पर्ट डॉक्टर रोहिणी पाटील यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात, त्यांनी महिलांमध्ये हे आजार का वाढत आहेत याची तीन प्रमुख कारण सांगितली आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, महिलांमध्ये हा आजार वाढण्याची तीन आणि महत्वाची कारण आहेत ते म्हणजे चुकीच्या खाण्यापिणाच्या सवयी. त्यांनी सांगितलेल्या सवयींमधल्या पहिला पदार्थ तुम्हाला शॉक करेल.
advertisement
चॉकलेट्स - अनेकदा महिलांना पीरियड्समध्ये चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा होते. काही प्रमाणात चॉकलेट खाणं ठीक असते पण त्याचा अतिरेक महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि पीसीओडी किंवा पीसीओएस यांसारख्या आजाराचा धोका वाढतो. चॉकलेटमुळे साखरेच्या असंतुलनामुळे शरीरावर परिणाम होतो, तर यामुळे वजनही वाढते.
कोक किंवा डायट कोक - अनेकदा आपल्याला थंड पिण्याची इच्छा होते आणि आपण सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करतो. पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. कोक किंवा डायट कोक या दोन्ही पेयांमध्ये साखरेचे प्रमाण अतिप्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढू शकते. डायट कोकमध्ये आपल्याला वाटते की साखर नसते पण हा चुकीचा समज आहे. डायट कोकमध्ये प्रिजर्वेटिव्हस आणि केमिकलचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पीसीओडी किंवा पीसीओएसचा त्रास होऊ शकतो.
advertisement
चपाती - हो, दैनंदिन आहाराचा भाग असलेली चपाती महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चपातीमध्ये ग्लूटीनचे प्रमाण अधिक असते जे हार्मोनवर परिणाम करते आणि शरीरातील इन्फ्लमेशन वाढवते ज्यामुळे पीसीओडी किंवा पीसीओएसचा धोका वाढतो. मिलेट चपातीचा रोजच्या आहारात समावेश करून तुम्ही या आजारांचा धोका कमी करू शकता. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : महिलांमध्ये का वाढतो PCOD किंवा PCOS चा धोका? डॉक्टरांनी सांगितली 3 महत्वाची कारणं, एक तर धक्कादायक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement