बारावीचा Physics चा पेपर लीक, झेरॉक्स सेंटरवर उत्तरासकट मिळाली प्रश्नपत्रिका, कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Maharastra 12th Physics paper leaked : शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभिनयाला खो मिळाला आहे. झेरॉक्स सेंटरवर 12 चा फिजिक्सचा पेपर उत्तरासह लीक झाल्याचं समोर आलं आहे.
Gondia Crime News : कॉपीमुक्त अभियानासाठी सध्या महाराष्ट्र सरकारसह जिल्हा यंत्रणा सुद्धा सज्ज असताना अनेक ठिकाणी बैठे पथक हे काम करीत आहेत. जेणेकरून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी. परंतू या योजनेला कुठेतरी खो देण्याचे काम गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका बारावीच्या परीक्षा केंद्रावर (Maharastra 12th Physics paper leaked) सोमवारी बारावी भौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न-उत्तरांची झेरॉक्स प्रत हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा
गोंदिया जिल्ह्यातील या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरात शाळेत एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा? व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स, सेंटरवरून केंद्रावर आली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, या प्रकरणात जेव्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संपर्क केल्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
हाताची घडी तोंडावर बोट
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास ते केंद्र कायमस्वरूपी बंद होणार असल्याचं देखील विभागाकडून सांगण्यात आलं होतं. 2018 पासून जे गैरप्रकार घडले त्या केंद्रावरील केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक आणि शिपाई बदलले. या केंद्रांवर तटस्थ शाळेचे स्टाफ नियुक्त करण्यात आले होते. यावर्षी परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं होतं.
advertisement
कोल्हापुरात सावळा गोंधळ
दरम्यान, बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना कोल्हापुरातल्या विमला गोयंका कॉलेजेमध्ये मात्र विद्यार्थ्याना चुकीचे रिसीट मिळाल्याचं समोर आलं होतं. काहींचे नाव चुकले आहे तर काहींचे विषय बदलून आले होते. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. अभ्यास न केलेल्या विषयांचे पेपर द्यायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला असून त्यांचे भवितव्य अंधारमय झालय. कॉलेजने मात्र याबाबत हात वर केले असून विद्यार्थ्यांनाच दोषी धरले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 18, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारावीचा Physics चा पेपर लीक, झेरॉक्स सेंटरवर उत्तरासकट मिळाली प्रश्नपत्रिका, कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा!