सफरचंदापेक्षा हलकं, तळहातापेक्षा लहान! मुंबईत जन्मलं सगळ्यात छोटं बाळ; जगलं कसं? डॉक्टरही आश्चर्यचकीत! म्हणाले, हा चमत्कार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Premature Smallest Baby : डॉक्टर म्हणाले, प्रत्येक दिवस लढाईचा होता. तिचं जगणं चमत्कारापेक्षा कमी नाही. हे बाळ भारतातील आतापर्यंतचे सर्वात लहान जिवंत बाळ आहे.
मुंबई : सामान्यपणे बाळाचं वजन अडीच, तीन, साडेतीन किलो म्हणजे जवळपास एक मोठी पपई किंवा एका मोठ्या कलिंगडाइतकं आणि आकारही तितकाच असतो. पण आता मुंबईत एका सफरचंदापेक्षाही हलकं आणि तळहातापेक्षाही लहान बाळ जन्माला आलं आहे. बाळाला पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहे. या बाळाचं जगणं म्हणजे डॉक्टरांनी चमत्कारचं म्हटलं आहे.
मालाडमधील सैनी कुटुंब, ज्यांची पहिली मुलगी प्रेग्नन्सीच्या 25 व्या आठवड्यात जन्माला आली तिचं वजन 550 ग्रॅम होतं. आता ती चार वर्षांची आहे आणि या कुटुंबाला दुसरी मुलगी झाली तीसुद्धा डिलीव्हरी डेटआधी 25 व्या आठवड्यातच जन्माला आली. पण तिचं वजन फक्त 350 ग्रॅम. इतकं छोटं बाळ पाहून डॉक्टरही थक्क झाले. या मुलीवर उपचार करणारे डॉ. नंदकिशोर काबरा म्हणाले की, तिचं वजन सफरचंदापेक्षा कमी होतं आणि ती प्रौढ व्यक्तीच्या तळहातापेक्षाही लहान होती.
advertisement
डॉ. काबरा यांनी सांगितलं की, जरी वैद्यकशास्त्राने इतकी प्रगती केली आहे की 500-600 ग्रॅम वजनाच्या प्रीमॅच्युअर बेबींना 60% पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये चांगल्या आरोग्यासाठी दूध पाजता येतं, तरी 350 ग्रॅम वजनाच्या बाळासाठी शक्यता कमी आहे. अशा बाळांना ते नॅनो प्रीमी म्हणतात.
advertisement
प्रत्येक दिवस लढाईचा
सांताक्रूझमधील सूर्या हॉस्पिटलमध्ये या मुलीवर उपचार झाले. जन्मानंतर पुढील चार महिने तिने रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सौम्य ब्रोन्कोपल्मोनरी डिस्प्लेसिया, व्हेंटिलेटरशी संबंधित न्यूमोनिया, सायटोमेगालोव्हायरस इन्फेक्शन, रेटिनोपॅथी आणि अशक्तपणा असे वेगवेगळे आजार आणि समस्यांशी झुंज दिली. तिला रक्त, इन्सुलिनची गरज होती. तसंच तिच्यात पोटॅशिअम आणि बोन मिनरल्सची कमतरता होती.
नवजात तज्ज्ञ डॉ. हरी बालसुब्रमण्यम म्हणाले की, प्रत्येक दिवस लढाईचा होता. आम्ही तिला कित्येक आठवडे अॅडव्हान्सत व्हेंटिलेशनवर ठेवलं, संसर्गावर उपचार केले, शुगरचे चढउतार नियंत्रित केले आणि तिच्या मेंदूचं, डोळ्यांचं बारकाईने निरीक्षण केलं. तिचं जगणं चमत्कारापेक्षा कमी नाही"
advertisement
सूर्या हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. भूपेंद्र अवस्थी म्हणाले की, हे बाळ भारतातील आतापर्यंतचे सर्वात लहान जिवंत बाळ आहे. सरकारी जेजे हॉस्पिटलच्या एनआयसीयूचे पर्यवेक्षण करणारे डॉ. प्रशांत माने यांनीही तेच म्हटलं. 350 ग्रॅम वजनाचं बाळ सगळ्यात हलक्या वजनाचं जगलेलं बाळ असेल.
124 दिवसांनंतर डिस्चार्ज
बाळाचे वडील म्हणाले की, गर्भाशयात पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने त्यांचं बाळ लवकर जन्माला आलं. 4 महिने त्यांनी त्याला सकाळी लवकर आईचं दूध मिळावं याची खात्री केली. "माझी पत्नी दररोज एनआयसीयूमध्ये जाऊन 8 तास कांगारू केअरदेत असे", असे ते म्हणाले.
advertisement
तब्बल 124 दिवस हे बाळ एनआयसीयूमध्ये होतं. 1 नोव्हेंबर रोजी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्जच्या वेळी तिचं वजन पाच पटीने वाढलं, ती 1.8 किलोची झाली. तिची लांबी 41.5 सेमी होती, तिच्या डोक्याचा घेर 29 सेमी होता. डॉ. काब्रा म्हणाले. "आम्ही चाचण्या केल्या आणि असं आढळलं की ती तिच्या वयाच्या मानाने न्यूरोलॉजिकलदृष्ट्या ती सामान्य आहे"
advertisement
हे बाळ आता महाराष्ट्रातील सगळ्यात कमी वजनाचं बाळ आहे. याआधी पुण्यात जन्मलेली शिवन्या जी 400 ग्रॅम वजनाची होती. 24 व्या आठवड्यात तिचा जन्म झाला होता. देशाचं म्हणाल तर भारतात केरळच्या कोचीमध्ये 2019 साली जन्मलेली झाया सगळ्यात कमी वजनाचं बाळ. जिचं वजनही जन्मावेळी 350 ग्रॅम होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 9:28 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सफरचंदापेक्षा हलकं, तळहातापेक्षा लहान! मुंबईत जन्मलं सगळ्यात छोटं बाळ; जगलं कसं? डॉक्टरही आश्चर्यचकीत! म्हणाले, हा चमत्कार


