advertisement

राजधानीत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उदय सामंत दिल्लीला रवाना; चर्चांना उधाण

Last Updated:

एकनाथ शिंदे दिल्लीत असतानाच त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा दिल्लीच्या दरबारी तापले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत.  विशेष म्हणजे, शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राज्याच्या सत्तेच्या समीकरणांबाबत काही मोठे निर्णय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने गूढ अधिकच वाढले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चललेल्या या सखोल चर्चेत राज्यातील विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाल्याचे माहिती समोर येत आहे. मात्र, अधिवेशनाच्या काळात झालेल्या या प्रदीर्घ भेटीमुळे राजकीय हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिंदे यांनी संसदेचे सभापती ओम बिर्ला यांचीही भेट घेतली.
advertisement

उदय सामंत तातडीने दिल्लीला रवाना 

एकनाथ शिंदे दिल्लीत असतानाच त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. सामंत हे तातडीने दिल्लीसाठी रवाना झाले आहे. उद्योग क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय किंवा आगामी राजकीय रणनीतीबाबत या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याने त्यामुळे या दौऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
advertisement

राजकारणात मोठे फेरबदल होण्याच्या शक्यता

मुंबईत महत्त्वाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शिंदे यांनी दिल्ली गाठल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याच्या मागण्यांसाठी हा दौरा असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी, या भेटींमधून राज्याच्या राजकारणात काही मोठे फेरबदल होण्याच्या देखील चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार

advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पाच राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात केंद्रीय भाजपची पुन्हा खलबतं सुरू झाली आहेत. पाच राज्यातील निवडणुका जाहीर होण्याआधी केंद्रीय संचलन समितीची बैठक पार पडली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजधानीत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उदय सामंत दिल्लीला रवाना; चर्चांना उधाण
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement