नवी कार घेतली, पण गाडीत सतत बिघाड; वैतागलेल्या व्यक्तीने शोरूमसमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेतलं अन्...
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
वारंवार शोरूममध्ये दाखवून देखील गाडीचं काम पूर्ण झालं नाही. अनेक वेळा शोरूमला भेट देऊन त्यांनी गाडीचं इंजिनदेखील बदलून घेतलं. मात्र, तरीही गाडीमध्ये बिघाड होत राहिले
अहमदनगर 18 ऑक्टोबर (साहेबराव कोकणे) : अनेकांचं स्वप्न असतं की भरपूर पैसे कमवून कार विकत घ्यावी. यासाठी लोक भरपूर मेहनत घेतात आणि आपलं हे स्वप्न पूर्ण करतात. मात्र एवढ्या मेहनतीने जमवलेल्या पैशांनी घेतलेली कार चांगली असावी, असं प्रत्येकालाच वाटतं. असं न झाल्यास कोणाचाही हिरमोड होईल, यात काही शंका नाही. अशीच एक घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. अहमदनगरच्या बोल्हेगाव एमआयडीसी साईबन रोड येथील रामचंद्र शंकर अनभुले यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी नगर मनमाड रोडवरील मारुती सुझुकीच्या कांकरिया शोरूमकडून फोर व्हीलर मारूती कार विकत घेतली होती. मात्र तीन महिन्यांमध्ये गाडीमध्ये अनेक बिघाड झाले.
वारंवार शोरूममध्ये दाखवून देखील गाडीचं काम पूर्ण झालं नाही. अनेक वेळा शोरूमला भेट देऊन त्यांनी गाडीचं इंजिनदेखील बदलून घेतलं. मात्र, तरीही गाडीमध्ये बिघाड होत राहिले. अनेक वेळा गाडीचे ब्रेक फेल होणे, इंजिन काम करणं बंद होणं, असे विविध बिघाड होत असल्यामुळे ती गाडी बदली करून दुसरी गाडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, यावर शोरूम प्रशासनाने कोणतंही पाऊल उचललं नाही.
advertisement
या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर रामचंद्र शंकर अनुभुले यांनी कठोर भूमिका घेतली. ब्रेक फेल होऊन दुसऱ्याचा जीव घेण्यापेक्षा स्वतःच आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी शोरूमच्या दारामध्ये कार उभी करत गाडीसह स्वतःला संपवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अनभुले यांनी बाटलीमध्ये भरलेलं पेट्रोल स्वतःच्या अंगावर टाकत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली ताब्यात घेतली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेनं एकच खळबळ उडाली.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Oct 18, 2023 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
नवी कार घेतली, पण गाडीत सतत बिघाड; वैतागलेल्या व्यक्तीने शोरूमसमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेतलं अन्...









