Ahmednagar Lok Sabha : 'यापुढे विधानसभा-लोकसभेच्या निवडणुका' शरद पवारांनी व्यक्ती केली सर्वात मोठी भिती
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ahmednagar Lok Sabha : यापुढे देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत, अशी भिती शरद पवार यांनी व्यक्त केली. ते निलेश लंके यांच्या प्रचारसभेत श्रीगोंदा येथे बोलत होते.
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : अहमदनगर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपा निवडणुका घेत नाही. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात पुन्हा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्र अध्यक्षांसारखे भारतात निवडणुका घेण्याचे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले. ते श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीची सभा घेण्यात आली. या सभेला शरद पवार, संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळेस बाळासाहेब थोरात यांनीही मोदींवर टीका केली. आता खेळामध्येही राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे. थोरात यांनी आयपीएलमध्ये एका संघाचा रोहित शर्मा हे कॅप्टन होते, त्यांना बदलून हार्दिक पांड्या यांना कप्तान केले आहे. हार्दिक पांड्या फक्त गुजरातचा असल्यामुळेच त्याला कॅप्टन किल्ल्याच्या भावना इतर खेळाडूंमध्ये झाल्याने खेळाडूंमध्ये मोठी नाराजी आहे. यापूर्वी अशा प्रकारचे राजकारण कधीही झाले नव्हते असेही थोरात म्हणाले.
advertisement
संजय राऊत यांनीही भाजपावर टीका केली. देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात भारतात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षात दिसतील. पंतप्रधान हे प्रधानमंत्री राहिले नसून ते आता प्रचारमंत्री झाले आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेता याव्यात म्हणून महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक बदललं गेलं. एवढ्या मोठ्या सभा का घ्याव्या लागतात? भारतातील संसदीय लोकशाही ही धोक्यात असून संविधान बदलण्याचा डाव पंतप्रधानांचा आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही. तसेच विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका ही येणाऱ्या काळात होणार नाही अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 08, 2024 5:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar Lok Sabha : 'यापुढे विधानसभा-लोकसभेच्या निवडणुका' शरद पवारांनी व्यक्ती केली सर्वात मोठी भिती


