अहमदनगरमध्ये ट्रक-टँकरचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
कल्याण -निर्मळ महामार्गावरील करंजी घाटाच्या पायथ्याला ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अहमदनगर, 17 ऑक्टोबर, साहेबराव कोकणे : जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण -निर्मळ महामार्गावरील करंजी घाटाच्या पायथ्याला ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनाच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान आयशर ट्रक आणि दुधाच्या टॅंकरची समोरा-समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहानांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पैठणवरून आयशर ट्रक कट्टे घेऊन अहमदनगरच्या दिशेनं निघाला होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे जात होता. करंजी घाट संपल्यानंतर थोड्याच अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालक जावेद मन्सुर शेख आणि टॅंकर चालक शिवाजी नानासाहेब भवार यांचा मृत्यू झाला आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 17, 2023 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
अहमदनगरमध्ये ट्रक-टँकरचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी


