विहीर खोदण्यासाठी लावल्या जिलेटीनच्या कांड्या, स्फोटात तिघांचा मृत्यू; अहमदनगर हादरलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जिलेटीनचा स्फोट इतका भीषण होता की विहिरीत असलेले कामगार बाहेर फेकले गेले. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
साहेबराव कोकणे, अहमदनगर : विहीर खोदण्याचं काम सुरु असताना जिलेटीनच्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातल्या टाकळी कडेवळीत घडलीय. या स्फोटात तीन जण ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे टाकळी कडेवाळीत शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, टाकळी कडेवळीत शेडगाव रस्त्यावर विहीरीचं खोदकाम सुरू होते. त्या ठिकाणी जिलेटीनचा स्फोट घडवण्यासाठी जॅकंबरने छिद्रे मारली होती. त्यात जिलेटीनच्या कांड्याही भरल्या. त्याचवेळी साचलेलं पाणी काढण्यासाठी पंप विहीरीत टाकला. पंप सुरू करताच जिलेटीनचा भीषण स्फोट झाला.
जिलेटीनचा स्फोट इतका भीषण होता की विहिरीत असलेले कामगार बाहेर फेकले गेले. गणेश नामदेव वाळुंज, सूरज युसूफ इनामदार, नागनाथ भालचंद्र गावडे या तिघांचा मृत्यू झाला. तर जबर सुलेमान इनामदार, वामन गेणा रणसिंग आणि रवींद्र गणपत खामकर हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णलयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2024 8:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
विहीर खोदण्यासाठी लावल्या जिलेटीनच्या कांड्या, स्फोटात तिघांचा मृत्यू; अहमदनगर हादरलं


