Ahmednagar Lok Sabha : ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्याला मिळालंय यश! नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास कोणाच्या बाजूने?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ahmednagar Lok Sabha : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी पक्ष बदलून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारा यश मिळत असल्याचा इतिहास आहे. आतापर्यंत 5 पैकी 4 जण अशा प्रकारे निवडूण आले आहेत.
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून यावेळी भाजपाने खासदार डॉक्टर सुजय विखे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके हे निवडणूक लढवणार आहेत. या लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये आजपर्यंत पाच जणांनी ऐन निवडणुकीच्या वेळेस पक्ष बदलून निवडणूक लढवल्या आणि त्या जिंकल्याही आहेत.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात 1998 पर्यंत काँग्रेसचा दबदबा होता. त्यानंतर मात्र स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या माध्यमातून शिवसेनेने या मतदारसंघात प्रवेश केला. मात्र, या मतदारसंघांमध्ये 1998 साली बाळासाहेब विखे पाटील यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि 1998 मध्ये ते विजयी झाले. त्यानंतर 1904 मध्ये तुकाराम गडाख हे अपक्ष होते, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि ते विजय झाले. 2014 मध्ये राजीव राजळे हे अपक्ष होते, त्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्ये असलेले विखे परिवार यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर सुजय विखे यांना तिकीट मागितलं आणि त्यांनी भाजपात प्रवेश केला ते विजय झाले. यावर्षीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेस भाजपाचे खासदार सुजय विखे आणि माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत रंगणार आहे.
advertisement
यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पक्ष बदलायचे आणि निवडून यायचं हे काही सूत्र जमलं होतं. मात्र, या सूत्राला भाजपाचे तत्कालीन खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांनी तडा दिला. गांधी यांनी पक्ष न बदलता, 1999, 2009 आणि 2014 या तीन वेळेस खासदारकी लढवली आणि त्यांनी ती जिंकली. मात्र, गांधी यांचे तिकीट बदलून त्यावेळेस सुजय विखे यांना देण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून पाच उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यात चार जणांना यश आले आहे तर राजीव राजळे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या वेळच्या निवडणुकांमध्ये आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आणि पक्ष बदलून ही निवडणूक लढवत आहे. यात त्यांना कितपत यश येतं हे मतदार राजा ठरवणार आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Apr 07, 2024 4:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar Lok Sabha : ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्याला मिळालंय यश! नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास कोणाच्या बाजूने?







