Shevgaon News : नेम हुकला अन् गेम फसला! शेवगाव गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण; मारेकऱ्याचाच गेला जीव

Last Updated:

Shevgaon News : शेवगाव गोळीबार प्रकरणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिन्या कापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पिन्या कापसे
आरोपी पिन्या कापसे
अहमदनगर, (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी) : शेवगाव-गेवराई मार्गावरील एका हॉटेलजवळ रविवारी दुपारी गोळीबार झाला होता. या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून पिन्या कापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर जखमी युवकाचा सोमवारी दुपारच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अर्जुन संजय पवार, असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो मूळचा या प्रकरणात यवतमाळचा रहिवासी आहे. याबाबत राजेश गणेश राठोड त्याच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अर्जुन पवार आणि राजेश राठोड हे दोघे गुरुवारी शेवगावला आले. त्याने पाथर्डीजवळील एका शेडमध्ये त्यांना सोडले. तेथे चौघे मुक्कामी राहिले. शुक्रवारी संदीप मच्छिंद्र पवार याने मोबाइल मधील फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून, त्याला संपवायचे आहे, असे सांगितले होते. शनिवारी (दि. 2) मार्च सकाळी संदीप पवार हा मुक्कामाच्या ठिकाणी आला. दोन पिस्टल आणि तीन कोयते दाखवून स्वतःजवळ ठेवले. त्यांनतर सर्व चौघे दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून शेवगाव येथे गेले. कापसे न सापडल्याने पुन्हा पाथर्डीला परतले. रविवारी संदीप आणि अन्वर हे पाथर्डीला आले. यातील संदीप याने एक पिस्टल गणेश तर दूसरे डीके याच्याकडे दिले. त्यानंतर पिन्या कापसे शेवगाव येथील हॉटेल शुभम शेजारील रसवंतीगृह येथे बसलेला असल्याचे सांगितले. ते सर्वजण दोन दुचाकींवरून तेथे पोहोचले. दुपारी दीडच्या सुमारास डीके याने पिस्टलमधून फायरचा प्रयत्न केला. तसेच गणेश यानेही त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले. परंतु, ते पिन्या कापसे याला लागलेच नाहीत. त्यांनतर सर्वजण तेथून जात असताना पिन्याने एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
advertisement
नेम चुकला अन् कापसे वाचला..
अर्जुन पवार, राजेश गणेश राठोड हे पिन्या कापसे याला मारण्यासाठी शेवगावला आले होते. त्या दोघा युवकांच्या बंदुकीचा नेम चुकल्याने तो वाचला. त्यानंतर कापसे याने मारण्यासाठी आलेल्या युवकांनाच बेदम मारहाण केली. दरम्यान, या हाणामारीत कापसेदेखील जखमी असल्याने त्याच्यावर नगर येथे वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Shevgaon News : नेम हुकला अन् गेम फसला! शेवगाव गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण; मारेकऱ्याचाच गेला जीव
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement