मास्तरीणबाईंची बदली रद्द करण्यासाठी अख्ख गाव एकवटलं; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आवडत्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केलं आहे.
अहमदनगर, 1 ऑगस्ट, साहेबराव कोकंणे : विद्यार्थी आणि शिक्षकांचं एक वेगळंच नातं असतं. आवडत्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केल्याची बातमी समोर आली आहे. जोपर्यंत बदली रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. ही बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या हिंगणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील.
या शाळेतील शिक्षिका सविता कार्ले यांची श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे बदली झाली. त्या आज एक ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू देखील झाल्या. मात्र आपल्या आवडत्या शिक्षेकेच्या बदलीची बातमी कळताच विद्यार्थ्यांना आश्रू अनावर झाले. मॅडमची बदली रद्द करा, मॅडमची बदली झाली तर आम्ही शाळेत जाणार नाही अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली.
advertisement
विद्यार्थी प्रिय मॅडम अशी कार्ले यांची ओळख आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. अध्यापना बरोबरच शाळेतील सर्वच उपक्रमात त्यांचा पुढाकार असायचा. विद्यार्थ्यांना त्या कायम प्रोत्साहित करत असत. ग्रामस्थांनाही त्यांच्या शिकवण्याची पद्धत माहिती असल्यामुळे अखेर ग्रामस्थही विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला टाळे ठोकत जोपर्यंत बदली रद्द होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरच ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 01, 2023 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
मास्तरीणबाईंची बदली रद्द करण्यासाठी अख्ख गाव एकवटलं; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू


