Thackeray Group Protest : '...म्हणून ठाकरेंनी धारावीत मोर्चा काढला' विखे पाटलांनी शिवसेनेला डिवचलं, म्हणाले..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Shivsena Uddhav Thackeray Group Protest : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धारावीत आज मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर, 16 डिसेंबर (हरीष दिमोटे, प्रतिनिधी): राज्य सरकारने धारावीच्या विकासाचे काम बड्या उद्योग समुहाकडे दिले आहे. त्याविरोधात आज शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता ठाकरे गटाचा हा मोर्चा आहे. या मोर्चात महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. दरम्यान, यावर भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. आज मुंबईत होणारा मोर्चा म्हणजे केवळ सत्ता गेल्याचं वैफल्य असल्याने विरोधक एकत्र आल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. यांना धारावीचं काही पडलं नसून राहीलं साहीलं अस्तित्व टिकवण्याचं दुखः असल्याची टीकाही विखे पाटील यांनी आजच्या धारावी प्रकल्प विरोधात निघालेल्या मोर्चावर केली.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात एकदाही मंत्रालयात जाण्याची तसदी घेतली नाही. केवळ माझे कुटूंब तुमची जबाबदारी ही घोषणा केली. राज्य गेलं वाऱ्यावर अशी स्थिती होती. आजचा मोर्चा म्हणजे सत्ता गेल्याचं आणि पक्ष राहीला नसल्याचं वैफल्य असून सगळे समदुखीः एकत्र आले आहेत. हा मोर्चा म्हणजे दुखीःतांचा मोर्चा असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
advertisement
मराठा आरक्षणावरुन पवारांवर टीका
शरद पवार यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रात सत्ता गाजवली. मराठा लिडर म्हणून मान्यता घेतली. राज्यात आणि देशात राजकारण केलं. मग मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही? ही जबाबदारी त्यांनी स्विकारलीच पाहीजे. तुम्हाला कोणी थांबवले होते का? असा सवाल उपस्थित करत मी मराठा आहे, हे म्हणायलाही तुम्हाला कमीपणा वाटायला लागला असून पवार साहेबांनी एक मराठा लाख मराठा ही घोषणा द्यावी तर आरक्षणाबद्दल तुमची समाजाशी बांधिलकी आहे हे तरी कळेल, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांवर केली.
advertisement
राज्यात लोकायुक्त विधेयक आलं पाहीजे ही अण्णा हजारे यांची मागणी होती. मुख्यमंत्री आणि फडणवीस यांचा विशेष पुढाकार होता. अण्णा हजारेंची मागणी पूर्ण झाली याचे समाधान आहे. भ्रष्टाचाराचे निर्मुलन व्हावे यासाठी सरकारची बांधीलकी आहे. सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असल्याचे विखे पाटील म्हणाले.
advertisement
दुधाच्या भावात घसरण झाल्यानंतर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सगळ्या दुध संघाचे प्रतीनिधी बैठकीला होते. साखरेला एफआरपी ठरवलेली आहे. साखरेचे दर कमीजास्त झाले तरी भाव द्यावा लागतो. दुध संघांनाही असा नफा तोटा होत असतो. 34 रूपये दिले पाहीजे ही सरकारची भुमिका आहे. शेतकऱ्यांना प्रतिलीटर अनुदान दिले पाहीजे हा प्रस्ताव आम्ही तपासतोय. सचिवांची कमेटी गठीत करण्यात आली आहे. दुध संघांनी सुद्धा आपलं दायित्व पूर्ण करायला हवं. जेव्हा नफा होतो तेव्हा शेतकऱ्यांना वाटत नाही. भाव पडले की तोटा होतो ही संघांची कोल्हेकुई आहे. कायदा करावा लागला तरी हरकत नाही. भाव देण्यासाठी बंधने घालावी लागतील, असं वक्तव्य दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar Cantonment,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 16, 2023 4:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Thackeray Group Protest : '...म्हणून ठाकरेंनी धारावीत मोर्चा काढला' विखे पाटलांनी शिवसेनेला डिवचलं, म्हणाले..


