रोहित पवार मंत्री होणार, कर्जत जामखेडमध्ये जाऊन शरद पवार यांची घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोहित पवार यांनी गत पाच वर्षात केलेल्या कामाचे कौतुक केले.
अहमदनगर (खर्डा) : रोहित पवार यांनी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी त्याला सांगितले की कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग आहे. तिथे काम करण्याची तुला चांगली संधी आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढवली. रोहितची पहिली पाच वर्षे ही तुमची सेवा करण्यासाठी होती. आता पुढील पाच वर्ष रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते तथा मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे सरकार आले तर रोहित पवार हे मंत्री असतील, असेच शरद पवार यांनी अप्रत्यक्ष सांगितले. त्यांच्या घोषणेने रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज भूषणसिंहराजे होळकर, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
advertisement
पाच वर्षे तुमची सेवा केली, रोहित पुढची पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा करेन!
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोहित पवार यांनी गत पाच वर्षात केलेल्या कामाचे कौतुक केले. रोहित पवार हे मला मंत्री करा असे कधीही बोलले नाहीत. मीही पहिले पाच वर्ष मंत्री नव्हतो. 1972 नंतर मी मंत्री झालो. वसंत दादांच्या काळात मी मंत्री होतो. त्यांचे सरकार गेल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. रोहितने गत पाच वर्षे तुम्हा कर्जत जामखेडकरांची सेवा केली. आता पुढील पाच वर्षे रोहित महाराष्ट्राची सेवा करेन, असे पवार म्हणाले.
advertisement
तुम्ही भूमिपुत्राच्या गप्पा मारू नका, जनतेचा एक प्रश्नही सोडवला नाही
सर्वसामान्य माणसांसाठी एमआयडीसी सारख्या चांगल्या प्रश्नाला इथल्या माजी लोकप्रतिनिधीने विरोध केला. अडथळे आणण्याचे काम केले. तुम्ही कसले भूमिपुत्र..? दहा वर्ष तुम्ही आमदार होतात. पाच वर्षे मंत्री होतात, तरीही सर्वसामान्य माणसांचे एकही प्रश्न तुम्ही सोडू शकले नाहीत. तुम्ही भूमिपुत्राच्या गप्पा मारू नये, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर केली.
advertisement
रोहित काळजी करू नकोस, सगळे प्रश्न मार्गी लागतील
view commentsत्याचवेळी, रोहित काळजी करू नकोस दोन महिन्यांमध्ये सर्व प्रश्न निकाली लागतील कारण पुढील दोन महिन्यात महाराष्ट्र बदललेला असेल, आपली सत्ता येईल, असेही शरद पवार रोहित यांना उद्देशून म्हणाले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
September 28, 2024 9:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
रोहित पवार मंत्री होणार, कर्जत जामखेडमध्ये जाऊन शरद पवार यांची घोषणा


