इमान राखलं! ना शरद पवार, ना भुजबळ ना प्रफुल्ल पटेल, अजितदादांच्या खास दोस्तामुळे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागली आहे. आज त्यांचा मुंबईत शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. पण त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी कुणी फिल्डिंग लावली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असला तरी आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार? उपमुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार? तसेच त्यांच्याकडे असलेली खाती कुणाकडे जाणार? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदासाठी वर्णी लागली आहे. आज त्यांचा मुंबईत शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे.
अजित दादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद कुणाला मिळणार ? याबाबत विविध नावं समोर येत होती. पक्षात अनेक सिनीयर नेते आहेत. त्यांच्यापैकी एकाला कुणाला तरी हे पद मिळू शकतं, अशी चर्चा होती. यासाठी अनेक नेते शर्यतीत होते. पण अचानक सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागली. सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लावण्यामध्ये अजित पवारांच्या खास दोस्ताचा हात असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या एका सहकाऱ्यानेच सगळी सूत्र फिरवत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे.
advertisement
खरं तर, शरद पवारच सुनेत्रा पवारांचे राजकीय भवितव्य ठरवतील. राष्ट्रवादी विलीनीकरणाचा अंतिम निर्णय घेतील, असे शुक्रवारी दुपारपर्यंत म्हटले गेले. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली. पक्षांतर्गत चर्चा केल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाविषयी सर्वानुमते ठरवू, असं त्यांनी म्हटलं होतं. पण विधानसभेला अजित पवारांचे हे राजकीय सल्लागार म्हणून काम केलेले नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवारांशी संपर्क साधला आणि काही मिनिटांतच राजकीय चित्र बदलले. आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहोत, असं सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर भुजबळांनी माध्यमांना माहिती दिली.
advertisement
नरेश आरोरा हे अजित पवारांचे निकटवर्तीय सहकारी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं कॅम्पेन राबवण्याची सगळी जबाबदारी आरोरा यांच्याकडे होती. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचं 'पिंक कॅम्पेन' चालण्यामध्ये प्रमुख भूमिका नरेश आरोरांची होती. ते राजकीय सल्लागार म्हणून काम करत होते. आता अजित पवारांच्या निधनानंतर फारसा राजकीय अनुभव नसणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी नरेश आरोरांनीच फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इमान राखलं! ना शरद पवार, ना भुजबळ ना प्रफुल्ल पटेल, अजितदादांच्या खास दोस्तामुळे सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद








