हा प्रश्न राष्ट्रवादीचा आहे
तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असे मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सांगितलं आहे
आम्हाला काही अडचण नाही
खूप घाई होते आहे
काही तांत्रिक अडचण किंवा रणनीती असेल, त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतलाय
घाई होते आहे की नाही याबाबत मी काय बोलावे
त्यांची काही तरी अडचण असेल, काही तरी कारण असेल
सुनेत्रा पवार यांच्याबाबत केवळ ३-४ जण निर्णय घेत आहेत, आम्हाला या बाबत काहीच कल्पना नसून आम्ही केवळ टिव्हीवर बातम्या बघतोय
कुटुंबासाठी कठीण वेळ असताना रणनितीकारला विचारुन निर्णय घेणार का ? पवार कुटुंबियांचा सवाल
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला शरद पवार ,सुप्रिया सुळे येणार नाहीत
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मुंबईत होणाऱ्या शपथवीधी सोहळ्याला शरद पवार कुटूंबिय उपस्थित राहणार नाही.
आम्हाला कोणतीही कल्पना नाही. शरद पवार यांचे वक्तव्य
सुप्रिया सुळे यांची ही आम्हाला कोणता शपथवीधी यांची माहिती नसल्याचे म्हणणे..
खासदार सुप्रिया सुळे आज रात्रीच दिल्लीत येणार
संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने सुळे दिल्लीत जाणार
उद्या संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावेळी सुप्रिया सुळे उपस्थित राहणार
अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर सुप्रिया सुळे तातडीने दिल्लीतून बारामतीला गेल्या होत्या
राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना सुप्रिया सुळे अधिवेशनासाठी दिल्लीत येणार
दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजितदादांच्या मृत्यूला ७२ तासंही झाले नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची धुरा आणि वाटचाल कशी असणार? याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर सुनेत्रा पवार आज संध्याकाळी ५ वाजता या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यांनी देखील या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे निर्णय भाजप घेतंय का? शरद पवारांनी दोन शब्दांत दिलं उत्तर
सकाळ पासून १.३० वाजे पर्यंत देवगिरी बंगला येथे असणार
एनसीपी आमदार इतर नेते यांच्या भेटी
एनसीपी कोअर टीम नेते सकाळी देवगिरी बंगला येथे सकाळी १० वा. येणार त्यांच्यात बैठक
विधानभवकडे १.३० वा. निघणार
विधानभवनात २ वाजता एनसीपी विधीमंडळ बैठकीस हजर
त्यानंतर देवगिरी बंगला-
सायंकाळ ४.३० वा. राजभवन याकडे जाणार शपथविधी यासाठी
राज्यसभेच्या जागी पार्थ पवारांची वर्णी लागणार आहे…
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यावर पार्थ पवार यांची नियुक्ती केली जाणार आहे…
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष होणार ..
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यावर पार्थ पवार यांची नियुक्ती केली जाणार ..
धनंजय मुंडेना मंत्रिपद देण्याचा निर्णय होणार ..
अजित पवार यांच्या पत्नी
राज्यसभेच्या खासदार
बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्षा
महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठं काम
बारामतीत शेती, समाजकारणात योगदान
विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती
एन्व्हायर्नमेंटल फोरमच्या अध्यक्ष
सुनेत्रा पवारांची कारकीर्द
जन्म – 18 ऑक्टोबर 1963 धाराशिव
माजी राज्यमंत्री पद्मसिंह पाटलांची बहीण
अजित पवार यांच्या पत्नी
राजकारण, समाजकारणाचा वारसा
राज्यसभेच्या खासदार
बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्षा
महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठं काम
बारामतीत शेती, समाजकारणात योगदान
विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती
एन्व्हायर्नमेंटल फोरमच्या अध्यक्षा
शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक
दुपारी 2 वा. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
राष्ट्रवादीचा गटनेता निवडला जाणार
गटनेता म्हणून सुनेत्रा पवारांची निवड
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर शपथविधी
शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी
लोकभवन होणार शपथविधी
राजभवनात शपथविधीसाठी तयारी
सुनेत्रा पवारांचा आज शपथविधी…
सुनेत्रा पवार होणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…
शपविधीसाठी लोकभवनात तयारी सुरू….
सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार…
अजित पवारांच्या निधनानं कोसळलेले शरद पवार पुन्हा मैदानात उभे… नीरा नदीतल्या प्रदूषणाची शरद पवारांची पाहणी… बारामतीची सूत्रं पुन्हा घेतली हाती…
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार.. मात्र अजित पवारांकडील वित्त, नियोजन खातं भाजपकडे राहणार… सूत्रांची माहिती…
राष्ट्रवादीबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल… त्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल… सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य…
सुनेत्रा पवारच होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा…अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडेच पक्षाची धुरा….



