T20 World Cup ला 6 दिवस शिल्लक असताना ICC ची मोठी कारवाई, 31 वर्षाचा स्टार खेळाडू निलंबित!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Aaron Jones Suspended For Fixing : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचा 31 वर्षीय स्टार बॅटर आणि माजी कर्णधार ॲरॉन जोन्स (Aaron Jones) याला मॅच फिक्सिंगच्या गंभीर आरोपांखाली तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.
ICC suspends batter for match fixing : क्रिकेटचा महाकुंभ असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला आता येत्या सहा दिवसात सुरूवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित केली गेलीये. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कर तोंडावर असताना आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने एका स्टार क्रिकेटरला निलंबित केलं आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. हा खेळाडू कोण? तुम्हाला माहितीये का?
31 वर्षीय स्टार बॅटर
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचा 31 वर्षीय स्टार बॅटर आणि माजी कर्णधार ॲरॉन जोन्स (Aaron Jones) याला मॅच फिक्सिंगच्या गंभीर आरोपांखाली तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने (ICC) बुधवारी या कारवाईची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे अमेरिकन टीमला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
40 बॉल्समध्ये 94 रन्सची खेळी
न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या 31 वर्षाच्या ॲरॉन जोन्सने 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये कॅनडाविरुद्ध केवळ 40 बॉल्समध्ये 94 रन्सची नाबाद खेळ करून सर्वांना तोंडात बोटं घालायला लावली होती. मात्र, आता त्याच्यावर भ्रष्ट प्रस्तावाची माहिती अधिकाऱ्यांना न देणं आणि तपासात सहकार्य न करणं असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. आयसीसीने स्पष्ट केलं आहे की, जोन्सने क्रिकेट वेस्ट इंडिज आणि आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे एकूण 5 वेळा उल्लंघन केले आहे. एक दोनदा नाही तर पाच वेळा गुन्हा केल्याने आयसीसीने मोठं पाऊल उचललंय.
advertisement
नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका
दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य दुवा 2023-24 मधील 'BIM10' टूर्नामेंटशी जोडला गेला असून, त्यावेळच्या काही संशयास्पद हालचालींमुळे तो अडचणीत आला आहे. याव्यतिरिक्त, दोन आंतरराष्ट्रीय मॅच दरम्यानही त्याने नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या निलंबनामुळे तो आता आगामी वर्ल्ड कपच्या निवडीसाठी अपात्र ठरणार असून अमेरिकन टीमसाठी हा एक मोठा सेटबॅक मानला जात आहे.
advertisement
USA T20 विश्वचषक 2026 संघ: मोनांक पटेल (C), जेसी सिंग (VC), अँड्रिज गॉस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्तुश केंजिगे, शेडली व्हॅन शाल्क्विक, मोहम्मद अली खान, मोहम्मद अली खान, मोहम्मद खान.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:05 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup ला 6 दिवस शिल्लक असताना ICC ची मोठी कारवाई, 31 वर्षाचा स्टार खेळाडू निलंबित!










