Yuvi On Abhishek : युवराजने शब्द दिला! 'चार वर्षात तू इंडियासाठी खेळणार' अन् अभिषेकने तांडव घातलं, वर्ल्ड कप चॅम्पियनचा खुलासा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yuvraj Singh on Abhishek Sharma : लॉकडाऊनच्या काळात युवराजने अभिषेक, शुभमन गिल आणि इतर तरुण खेळाडूंसाठी विशेष सराव शिबिरांचे आयोजन केले होते.
Yuvraj Singh on Abhishek Sharma : टीम इंडियाचा स्टार बॅटर अभिषेक शर्मा धुमाकूळ घातलाना दिसतोय. आपल्या आक्रमक फलंदाजीने त्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या. अशातच युवराजने अभिषेकसाठी बनवलेला 4 वर्षांचा विशेष आराखडा पूर्ण झाला असून, अभिषेकने अपेक्षेनुसार भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. नुकत्याच सानिया मिर्झासोबत झालेल्या एका पॉडकास्टमध्ये युवराजने याबद्दलचा खुलासा केला की, त्याने अभिषेकला केवळ आयपीएलसाठी नाही, तर देशासाठी खेळण्यासाठी तयार केले होते, असं युवी म्हणाला.
4 वर्षांचा प्लॅन तयार केला
युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली अभिषेकने आपली फलंदाजी आणि मानसिक ताकद कमालीची सुधारली आहे. युवीने सांगितलं की, "आम्ही त्याच्यासाठी 4 वर्षांचा प्लॅन तयार केला होता. जर त्याने काही ठराविक गोष्टींचे काटेकोरपणे पालन केलं, तर त्याचे टॅलेंट त्याला भारतीय स्तरापर्यंत नक्कीच घेऊन जाईल, असा मला विश्वास होता." विशेष म्हणजे, युवराजच्या या मार्गदर्शनानंतर बरोबर 4 वर्षे आणि 3 महिन्यांत अभिषेकने भारतीय जर्सी घातली.
advertisement
Yuvi on Abhishek Sharma
"We made a 4year plan for him, if he followed certain things for four years, his talent would take him to India level."
In 4 years 3 months he played for pic.twitter.com/ml1dhnqDUX
— Sunrisers Army (@srhorangearmy) January 29, 2026
advertisement
चार वर्ष तीन महिन्यानंतर अभिषेक टीम इंडियामध्ये
युवराजने सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. शुभमन आणि अभिषेकला तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागल्या. शुभमन गिल ऑलरेडी टीम इंडियामध्ये खेळत होता. त्यावेळी मी चार वर्षांचा वेळ दिला होता. त्यानंतर बरोबर चार वर्ष तीन महिन्यानंतर अभिषेक टीम इंडियामध्ये सिलेक्ट झाला, असं युवराज सिंगने म्हटलं आहे.
advertisement
तुला देशासाठी मॅचेस जिंकून द्यायच्यात
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात युवराजने अभिषेक, शुभमन गिल आणि इतर तरुण खेळाडूंसाठी विशेष सराव शिबिरांचे आयोजन केले होते. "मी तुला देशासाठी मॅचेस जिंकून देण्यासाठी तयार करत आहे, हे लिहून ठेव," असे प्रेरणादायी शब्द युवराजने त्यावेळी अभिषेकला म्हटले होते, जे आता सत्यात उतरले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 1:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yuvi On Abhishek : युवराजने शब्द दिला! 'चार वर्षात तू इंडियासाठी खेळणार' अन् अभिषेकने तांडव घातलं, वर्ल्ड कप चॅम्पियनचा खुलासा










