Ajit Pawar: 'दादा डान्स छान होता', कौतुक ऐकताच अजित पवारांचा चेहरा खुलला, म्हणाले अरे तुम्ही...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवारांना लेकाच्या लग्नातील डान्सचे कौतुक केले. त्यावेळी अजित पवारांच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
नागपूर: आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Winter Session) सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. लेकाचं लग्न आटपून आज अजित पवार बहरीनला पोहचले आहे. लेकाच्या लग्नानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. त्यावेळी अजित पवारांना लेकाच्या लग्नातील डान्सचे कौतुक केले. त्यावेळी अजित पवारांच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्री अजित पवाराच्या यांच्या धाकट्या लेकाचा बहरीन येथे थाटामाटात विवाह पार पडला. या विवाहसोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अजित पवारांचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय याविषयी अजित पवारांना विचारले असता दादांचा चेहरा चांगलाच खुलला.
advertisement
अजित पवारांची मिश्किल शैली
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. अधिकाऱ्यांना झापणं, पहाटेच्या वेळी पाहणी करणं किंवा मिश्किल प्रतिक्रिया देणं या त्यांच्या कृतींची नेहमीच चर्चा होते. आजही नागपुरातील विधानभवनाच्या आवारात अजित पवारांची मिश्किल शैली पाहायला मिळाली. अजित पवार आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एन्ट्री सुट-बुट परिधान करुन झाली. यावेळी अजित पवारांचा या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी एका पत्रकाराने अजित पवारांना दादा डान्स खूप छान होता, असं म्हणत कौतुक केलं. पत्रकाराने दिलेली दाद ऐकताच दादांचा चेहरा खुलला आणि त्यांनी त्यावर स्मितहास्य केलं.
advertisement
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तर दादा पाय बरा आहे ना, अशी एकाने आपुलकीने चौकशी केली. त्यावर दादांनी हो ठीक आहे.काल स्प्रे मारला म्हणून आज आलो नाही कालपर्यंत जाम होता. माझी काळजी घेता त्यामुळे बरं वाटतं, असं म्हणत दादांनी उपस्थितांची मने जिंकली.
पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण
जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघं 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.4 ते 7 डिसेंबर या कालावधीत या खास विवाह सोहळा बहरीन येथे होणार आहे. या सोहळ्याला पवार–पाटील कुटुंबीयांकडून 400 पाहुण्यांना निमंत्रण पाठण्यात आल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांनी शेअर केले जय पवार यांच्या लग्नातले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जय पवार यांच्या वरातीत रोहित पवार यांचा झिंगाट डान्स सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 08, 2025 3:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: 'दादा डान्स छान होता', कौतुक ऐकताच अजित पवारांचा चेहरा खुलला, म्हणाले अरे तुम्ही...


