9 वर्षांपूर्वी बाप 6 मतांनी हरला, लेकीनं पूर्ण केलं स्वप्न, विजयानंतर दोघंही ढसाढसा रडले

Last Updated:

Roha Nagar Parishad Election: रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

News18
News18
रोहा: रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे, या विजयाने एका मुलीने आपल्या वडिलांचं ९ वर्षांपूर्वीचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

बाप-लेकीच्या डोळ्यांत आनंदाश्रू

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वनश्री समीर शेडगे यांनी ४६९५ मतांच्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. २०१६ च्या निवडणुकीत वनश्री यांचे वडील समीर जनार्दन शेडगे यांना अपक्ष म्हणून लढताना केवळ ६ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. तो पराभव आणि त्यानंतर वडिलांची झालेली घालमेल कुटुंबाने जवळून पाहिली होती. रविवारी जेव्हा वनश्री यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली, तेव्हा समीर शेडगे आणि वनश्री या बाप-लेकीला अश्रू अनावर झाले. एकमेकांना मिठी मारून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, हे दृश्य पाहून उपस्थित मतदार देखील भावूक झाले.
advertisement

भाजपचं २५ वर्षांनंतर पुनरागमन

रोहा नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने तब्बल २५ वर्षांनंतर आपलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपचे तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू चाफेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. भाजपच्या या विजयामुळे शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
विशेष बाब म्हणजे रोहाची निवडणूक शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावं लागले. त्यांच्या उमेदवार सुप्रिया जाधव या विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे रोहामध्ये बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवारांनी बाजी मारली आहे. या विजयामुळे रोह्याच्या राजकारणात सुनील तटकरे आणि अजित पवार गटाची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
9 वर्षांपूर्वी बाप 6 मतांनी हरला, लेकीनं पूर्ण केलं स्वप्न, विजयानंतर दोघंही ढसाढसा रडले
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement